BJP News: कार्यकर्त्यांना डच्चू, आयारामांना पसंती; भाजप इतर पक्षातून आलेल्यांवर मेहेरबान, पाहा आकडेवारी

नांदेडमध्ये 67 पैकी तब्बल 45 जागांवर काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने कोणत्या शहरात किती आयारामांना उमेदवारी दिली याची माहिती घेऊयात.

जाहिरात
Read Time: 1 min

Mahapalika Election 2026: राज्यात 29 महापालिसाठी निवडणूक पार पडत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपने इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्याचे धोरण अवलंबले आहे. राज्यातील 29 पैकी किमान 19 महापालिकांमध्ये भाजपने आयातांना झुकते माप दिले आहे.

भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्य तब्बल 330 उमेदवारांना पक्षाने पसंती दिली आहे. 'जिंकणारा उमेदवार' हा एकमेव निकष लावून पक्षाने जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काही शहरातील आकडेवारी थक्क करणारी आहे.

नांदेडमध्ये 67 पैकी तब्बल 45 जागांवर काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने कोणत्या शहरात किती आयारामांना उमेदवारी दिली याची माहिती घेऊयात.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

भाजपने कुठे किती आयारामांना उमेदवारी?

  • मुंबई - 15
  • नागपूर- 3
  • अकोला - 7
  • अमरावती - 8
  • चंद्रपूर - 5
  • पुणे - 25
  • पिंपरी चिंचवड - 25
  • सोलापूर - 30
  • अहिल्यानगर - 12
  • नाशिक - 24
  • जळगाव - 11
  • धुळे - 12
  • छत्रपती संभाजीनगर - 16
  • लातूर - 17
  • नांदेड - 45
  • ठाणे - 4
  • कल्याण डोंबिवली - 11
  • नवी मुंबई - 28
  • जालना - 30
  • वसई - 9

Topics mentioned in this article