विधानसभा निवडणुकीत महायुतीचं जागावाटप कसं असेल; पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. माझं पूर्ण लक्ष आता विधानसभा निवडणुकीवर असणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

स्वानंद पाटील, बीड

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील तिकीट वाटपाचा तिढा केंद्राच्या सहिनेच सुटणार, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. राज्यातील महायुतीच्या पूर्ण जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी राज्यात कोअर कमिटी असेल, या कमिटीमध्ये मी देखील असणार आहे. महायुतीतील प्रमुख नेते ठरवतील त्यानंतर याबाबतचा अहवाला दिल्लीला पाठवला जाईल. दिल्लीत शिक्कामोर्तब होईल. महायुतीत कोण किती जागा लढवेल यावर आताचा काही बोलणे घाईचं होईल, असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. माझं पूर्ण लक्ष आता विधानसभा निवडणुकीवर असणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. तीन पक्ष असले तरीही बऱ्यापैकी जिथे ज्याची जास्त ताकद आहे, निवडून आलेला उमेदवार, कुठला उमेदवार किती फरकाने निवडून आला, या सर्वाचा विचार करूनच पुढचे निर्णय घेतले जातील. प्रत्येक पक्षाच्या कोअर टीम बसून या संदर्भात निर्णय घेतील, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. 

(नक्की वाचा - मोठी बातमी : 'अमित शहांनी शब्द पाळला नाही', शिवसेना नेत्याची नाराजी उघड)

ओबीसी-मराठा वाद हे फक्त बीड जिल्ह्याचे चित्र नाही तर राज्यात असंच चित्र आहे. बीड जिल्ह्यात बहुजन समाजाचा प्रमुख चेहरा मी एकमेव आहे. त्यामुळे इथलं वातावरण राज्यभर, देशभर चर्चिले जात आहे. येणाऱ्या काळात लोक योग्य तो निर्णय घेतील. मतदार फार हुशार असतात काय करायचं काय नाही करायचं हे त्यांना कळतं, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं. 

( नक्की वाचा : BJP vs NCP वाद चिघळला! अमोल मिटकरींनी केली भाजपाच्या बड्या मंत्र्यांची तक्रार )

एखादी निवडणूक असती ती लोकांना अपप्रचार आणि भुल थापावर जिंकता येऊ शकते. पण प्रत्येक निवडणुकीत अशा भिंती उभारणं एवढं सोपं नाही. चुकीचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणूक पाहायला मिळाला. मात्र विधानसभा निवडणुकीत तसं होऊ दिलं जाणार नाही, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं. 

Advertisement

Topics mentioned in this article