BJP Leader Accident Death : उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एका भीषण रस्ते अपघातात कन्नौजचे भाजपचे युवा नेते प्रशांत त्रिपाठी यांचा मृत्यू झाला आहे. थार कारचं नियंत्रण सुटलं आणि कार पलटी झाली. या अपघातात अन्य पाज जण गंभीर जखमी झाले आहेत. हरदोई जिल्ह्यातील माधौगंज-कन्नौज मार्गावर हा अपघात झाला. या दुर्घटनेत भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत त्रिपाठी यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर त्यांचे पाच सहकारी गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्या मृत्यूच्या घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि त्यांचे वडील गोपाल त्रिपाठी यांनाही मोठा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, सीतापूर सिधौली विभागात आयोजित एक कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व लोक थार गाडीतून कनौज येथे परतत होते. तेव्हा उशिरा रात्री समोरून येणाऱ्या एका वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.ज्यामुळे थार कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटली.अपघात घडल्यानंतर घटनास्थळी लोकांनी मोठा आरडाओरडा केला. त्यानंतर रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना कन्नोज जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्रशांत त्रिपाठी आणि शुभम तिवारी यांची प्रकृती पाहता त्यांना कानपूरच्या रिजेन्सी रुग्णालयात हलवलं.जिथे डॉक्टरांनी प्रशांतला मृत घोषित केलं.
नक्की वाचा >> Trending News: "300 कोटी मिळाले तर..",काँग्रेस आमदार निर्मला सप्रेंच्या विधानाने खळबळ, भाजपचंही टेन्शन वाढलं
गावाकडच्या राजकारणात होते भाजपचे सक्रिय नेते
अपघातात जखमी झालेल्या अन्य लोकांमध्ये विकास पांडे, शुभम तिवारी, बादल तिवारी, अमन तिवारी (सर्व रा.जसोदा कस्बा, कन्नोज) आणि पांडे पुरवा रहिवासी निशांत अग्निहोत्री यांचा समावेश आहे. प्रशांत त्रिपाठी कन्नोजच्या जसोदा कस्बे येथील रहिवासी होते. त्यांच्या विभागात सक्रिय युवा नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. प्रशांत यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी मानसी आणि चार वर्षीय मुलगी कनिका आहे.त्यांचे वडील गोपाल त्रिपाठी माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष राहिले आहेत. याप्रकरणी ठाणे प्रभारी विद्यासागर पालने म्हटलंय की,अपघातात जखमी झालेले लोक त्यांच्या उपचारासाठी गेले होते. जिथे उपचारादरम्यान,एका तरुणाचा मृत्यू झाला.पोलीस याप्रकरणी पुढील कार्यवाही करत आहेत.
नक्की वाचा >> Jalna News: नवरदेवाचा बूट पळवला अन् लग्न मंडपात झाला तुफान राडा, करवल्यांनी झिंज्या उपटल्या अन्..पाहा Video
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world