Badlapur News : 'ED कारवाईचा वसई- विरार फॉर्म्युला बदलापुरात वापरणार', भाजपा आमदाराचा इशारा

Badlapur News :  ED कारवाईचा वसई-विरारचा फॉर्म्युला बदलापूरमध्ये वापरण्याचा इशारा भाजपा आमदारांनी दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Badlapur News : भाजपा आमदार किसन कथोरेंनी ED कारवाईचा इशारा दिला आहे.
बदलापूर:

Badlapur News :  नालासोपारामधील अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीनं नुकतीच अटक केली आहे. ईडीनं या प्रकरणात पवारसह चार जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. वसई-विरार महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची पाळेमुळे या कारवाईनं उघड होण्याची शक्यता आहे. ED कारवाईचा वसई-विरारचा फॉर्म्युला बदलापूरमध्ये वापरण्याचा इशारा भाजपा आमदारांनी दिला आहे.

काय दिला इशारा ?

बदलापुरात वसई- विरार प्रमाणेच ईडी कारवाईचे संकेत सत्ताधारी भाजप आमदार किसन कथोरे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील वार्डरचनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून वार्ड रचना करतांना आर्थिक देवाणघेवाण करून मॅच फिक्सिंग झाल्याचा धक्कादायक आरोप मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. कथोरे यांनी थेट बदलापूर नगरपालिकेच्या प्रशासकांवर निशाणा साधत ईडी कारवाईचा इशारा दिला आहे. 

( नक्की वाचा : KDMC News : 'अंग्रेज गये , अपनी औलाद छोड गये', KDMC आयुक्तांबाबत बोलताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली! )
 

काही लोकांना हवे त्याप्रमाणे वार्ड रचना करण्यात आली असून नदी, रेल्वे रूळ, महामार्ग यांच्या सीमा ओलांडून एक वार्ड तयार केले असल्याचा आरोप कथोरेंनी केला आहे. तसेच ही गोपनीय वार्ड रचना उघड झाली असून ती सर्वसामान्य जनतेपर्यंत देखील पोहोचली आहे. तसेच हवी तशी वॉर्ड रचना तयार करून घेतली अशा देखील चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याचा आरोप आमदार कथोरेंनी केला आहे. 

प्रशासकांना भरला दम

यावेळी कथोरे यांनी थेट प्रशासकांना दम भरला प्रशासकांची मनमानी चालणार नाही, प्रशासक आमचा बाप होऊ शकत नाही, तुमचा बाप आम्ही इथे बसलो आहोत. प्रशासकांनी शिस्तीत जे करायला हवे ते केले नाहीत याचे सर्व सबळ पुरावे 18 तारखेला समोर आणून असा इशारा कथोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. अशाप्रकारे जर एखाद्या नगर परिषदेचा प्रशासक वागत असेल तर त्याची केवळ चौकशी नाही तर पूर्णपणे त्याला शासन व्हायला हवे, त्यामुळे वसई विरार प्रमाणे फॉर्म्युला वापरून त्यांची ईडी चौकशी करण्याचे संकेत त्यांनी दिलेत. त्यामुळे येथे 18 तारखेला आमदार कथोरे नगरपालिका आणि प्रशासक यांचे कोणकोणते घोटाळे बाहेर काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article