- महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख दोन जानेवारी होती
- राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असताना पनवेल महापालिकेत वेगळे घडले आहे
- पनवेल महापालिकेत भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा शेंडेंने उमेदवारी अर्ज मागे घेतला.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 2 जानेवारी ही शेवटची तारीख होती. त्यामुळे अनेक महापालिकांमधील लढती स्पष्ट झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधी पक्षातल्या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे भाजप उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला. जवळपास 44 उमेदवारी हे बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यात ही स्थिती असताना पनवेल महापालिकेत मात्र थोडं याच्या अगदी विरूद्ध घडलं आहे. इथं भाजपच्याच अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने इथं अपक्ष असलेल्या स्नेहल ढमाले-पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे त्या भाजप आमदाराच्या भगिनी आहेत. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे.
राज्यत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असताना पनवेल महापालिकेत मात्र भलतच घडलं आहे. भाजपचे विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या भगिनी स्नेहल ढमाले-पाटील यांची प्रभाग 18 'क' मधून बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, ही निवड भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा शेंडे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे झाल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आमदार भगिनी असल्यामुळे स्नेहल यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्याच वेळी सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या.
नक्की वाचा - 'हिजाबवर जर कोणी हात टाकला तर हात कापून टाकेन' जलील यांची धमकी कुणाला? वाद पेटणार?
भाजपवर घराणेशाहीचा आरोप होत आहे. नेत्याच्याच घरात उमेदवारी दिली जात आहे. एक एक घरात पाच पाच उमेदवारी दिल्याचे ही समोर आले होते. त्यामुळे भाजपची प्रतिमा त्यामुळे डागळली जात होती. त्यामुळे नेत्याच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले होते. त्यामुळे भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या बहिणीला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. अशा स्थितीत त्यांचा थेट सामना हा भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या स्नेहा शेंडे यांच्या सोबत होता. अशा स्थितीत आमदार काय करणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
धक्कादायक बाब म्हणजे, भाजपच्या अधिकृत उमेदवारालाच अर्ज मागे घ्यायला लावल्याचा आरोप आता आमदार विक्रांत पाटील यांच्यावर होत आहे. आमदारांच्या या कृतीमुळे भाजपमधील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यांनी या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी पेटण्याची शक्यत आहे. पनवेल महापालिकेत 2017 मध्ये भाजपचे 51 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी आता किती नगरसेवक निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.