जाहिरात

'हिजाबवर जर कोणी हात टाकला तर हात कापून टाकेन' जलील यांची धमकी कुणाला? वाद पेटणार?

पार्टी विथ डिफरन्स असं ते म्हणत असतात. पण तिकीट वाटपा वेळी या पक्षाची शिस्त देशाने पाहीली अशी खिल्ली त्यांनी यावेळी उडवली.

'हिजाबवर जर कोणी हात टाकला तर हात कापून टाकेन' जलील यांची धमकी कुणाला? वाद पेटणार?
  • जालना महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी हिजाबवर आक्रमक वक्तव्य केले आहे
  • जलील म्हणाले की धार्मिक परंपरांचा आदर करावा आणि मुस्लीम महिलांच्या हिजाबचा सन्मान केला पाहिजे
  • त्यांनी हिजाबला जबरदस्तीने विरोध केल्यास संबंधित व्यक्तीचे हात कापून टाकण्याचा इशारा दिला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
छत्रपती संभाजीनगर:

आकाश सावंत 

Chhatrapati Sambhaji Nagar: महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरूवात झाली आहे. त्यात आता एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हिजाबला हात लावण्याचा किंवा जबरदस्तीने विरोध करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे हात कापून टाकेल असा इशाराच जलील यांनी दिला. जालना महापालिका निवडणुकीच्या प्रचारा वेळी ते बोलत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुस्लीम महिलेच्या हिजाबला हात घातला होता. त्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटले होते. त्या पार्श्वभूमीवर जलील बोलत होते. पण त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  

हिजाबवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. ते म्हणाले की धर्माच्या परंपरांचा आदर केला पाहीजे.  जगभरातील मुस्लीम महिला स्वेच्छेने हिजाब परिधान करतात.  त्यांच्या धार्मिक भावनांचा सन्मान केला पाहिजे, असं जलील म्हणाले. पण जर कुणी हिजाबला हात लावण्याचा किंवा जबरदस्तीने विरोध करण्याचा प्रयत्न केला, तर हात कापून टाकेल असे ही त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला आहे.

नक्की वाचा - PCMC Election: 'फडणवीसांना आधीच सावध केलं होतं!' अजित पवारांबाबत भाजपा प्रदेशाध्यक्षाचं मोठं वक्तव्य

त्या आधी सभेत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप हा शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून घेतो. पार्टी विथ डिफरन्स असं ते म्हणत असतात. पण तिकीट वाटपा वेळी या पक्षाची शिस्त देशाने पाहीली अशी खिल्ली त्यांनी यावेळी उडवली. तिकीट वाटपावरून आमच्याकडे तर काहीच झालं नाही. मात्र भाजपकडे जे झालं ते पाहिलं का? ये हरामखोर..ये हरामखोर.. असं मंत्र्यांना त्यांच्याच पक्षाचे लोक म्हणत होते. यावेळी भाजपच्या दोन मंत्र्याची अक्षरश भर सभेत त्यांनी खिल्ली उडवली. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट वाटपावरून भाजपमध्ये मोठा असंतोष उफाळून आला होता. त्याचा धागा पकडत त्यांनी भाजपवर जोरदार टीकेची झोड उठवली.  

नक्की वाचा - BMC Election 2026 : खासदार संजय दिना पाटलांचा 'गेम' होतोय? भांडुपच्या रणांगणात पडद्यामागे मोठ्या हलचाली

इम्तियाज जलील जालना महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षातर्फे  उभ्या असलेल्या आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी छत्रपती संभाजीनगरात भाजपमध्ये झालेल्या राड्यावर बोलताना त्यांनी पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या शिस्तबद्ध भाजपाच्या एक माजी केंद्रीय मंत्री, एक राज्याचा मंत्री गाडीत बसलेला असताना एक महिलेने त्यांना,  ये हरामखोर.. ये हरामखोर म्हणत त्यांचा उद्धार कसा केला हेच सांगितले. पण त्यांनी हिजाबवरून केलेले वक्तव्य या सभेत गाजले. त्याचीच चर्चा राजकीय वर्तूळात सुरू होती. हिजाबच काय कुठल्या ही महिले सोबत गैरवर्तन झाले तरी आपण तेच करू असं ही त्यांनी यावेळी सांगितलं.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com