Parth Pawar: अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवण्यासाठी BJPचा विरोध? पुण्यातील ही गोष्ट भोवली?

Parth Pawar News: अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. भाजप पार्थ पवार यांच्या नावास पाठिंबा देण्यास तयार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. काय आहे यामागील कारण जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Parth Pawar: पार्थ पवार यांच्या नावास भाजपचा विरोध का? नेमके काय आहे कारण?"
PTI
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना राज्यसभेत पाठवले जाण्याची शक्यता : सूत्र
  • पार्थ पवार यांच्या नावास भाजपकडून विरोध : सूत्र
  • पुण्यातील भूखंड घोटाळ्यामुळे पार्थ पवार यांच्या नावास विरोध असल्याची सूत्रांची माहिती
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

- रामराजे शिंदे, प्रतिनिधी

Parth Pawar News: अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना राज्यसभेत पाठवले जाऊ शकते. दुसरीकडे भाजप पार्थ पवार यांच्या नावास पाठिंबा देण्यास तयार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. जय पवार यांच्या नावावर सहमती आहे, पण पार्थ पवार यांच्या नावाला भाजपाचा विरोध आहे, असल्याचे सूत्रांनी सांगितलंय. पार्थ पवार यांच्यावरील भूखंड घोटाळ्याचे आरोप असल्याने भाजप त्यांना विरोध करत असल्याचे म्हटलं जातंय. याआधी अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार यांना आई सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेत पाठवण्याची चर्चा होती. पण पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप असल्याने भाजपने यास विरोध दर्शवल्याचे म्हटले जात आहे.  

(नक्की वाचा: Vitthal Maniyar EXCLUSIVE: राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत अजित पवारांनी माझ्याकडे ही विनंती केली होती, विठ्ठल मणियार यांचा गौप्यस्फोट)

Photo Credit: PTI

पुण्यातील भूखंड घोटाळा नेमका काय आहे?

काही महिन्यांपूर्वी पुण्यातील उच्चभ्रू  मुंढवा परिसरात 40 एकर जमिनीच्या 300 कोटी रुपयांच्या विक्री व्यवहारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ही जमीन 'अमाडिया एंटरप्रायझेस एलएलपी' या कंपनीला विकण्यात आली होती, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा भागीदार म्हणून सहभाग असल्याची माहिती समोर आली होती. ही जमीन सरकारी असल्याचे माहिती समोर आल्यानं ही बाब वादग्रस्त ठरली होती. 
धक्कादायक बाब म्हणजे या व्यवहारात आवश्यक स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली होती. तसेच संबंधित जमिनीची किंमत जवळपास 1,800 कोटी रुपयांची असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर पार्थ पवार यांना 1,800 कोटींची सरकारी जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांत देण्यात आली, असाही आरोप करण्यात आला होता. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. 

(नक्की वाचा: Pratibha Pawar Viral Video: अख्खा महाराष्ट्र रडला पण 'अजितदादांच्या अंत्यविधीत प्रतिभाकाकीची हास्यजत्रा', नेटकऱ्यांचा संताप अनावर)

Photo Credit: PTI

पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूकही लढवलीय 

पार्थ पवार यांनी वर्ष 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीही पक्षातील त्यांची सक्रियता आणि कौटुंबिक राजकीय ओळख लक्षात घेता, त्यांना राज्यसभेत पाठवून मोठे व्यासपीठ देण्याच्या चर्चा बराच काळ सुरू होत्या.