गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी
Sindhudurg Snowfall News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारांचा पाऊस पडल्याची घटना ताजी असतानाच आता एका नव्या घटनेमुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.मालवण तालुक्यातील देवली गावातील खालची परबवाडी या ठिकाणी ही घटना घडलीय. येथे राहणाऱ्या विजय मधुकर देऊळकर यांच्या घरावर जवळपास 5 किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडला. बर्फाचा प्रहार इतका मोठा होता की, घराच्या छपरावरील कवलेही तुटली आहेत. या घटनेमुळं या गावात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवली गावचे सरपंच शाम वाककर यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि देऊलकर कुटुंबीयांशी चर्चा केली. तसेच याबाबत प्रशासनाला माहिती देऊन घटनेच्या शास्त्रीय कारणांचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या 'या' कॉलेजमध्ये मधमाशांचे पोळे अन् बरंच काही..विद्यार्थ्यींनी केलं बोंब ठोक आंदोलन
स्वयंपाक घरात मोठा आवाज झाला अन् त्यानंतर..
दुपारी अर्चना विजय देऊलकर या घरात असताना स्वयंपाक घरात मोठा आवाज झाला. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक बर्फाचा मोठा तुकडा घरावर कोसळला असल्याचं त्यांनी पाहिलं. दरम्यान, देऊलकर यांचे घर गावाच्या मध्यभागी आहे. त्यांच्या घरावर अचानक बर्फाचा तुकडा पडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील कोचिंग क्लासमध्ये भयंकर घटना, आठवीच्या विद्यार्थ्याचे प्रायव्हेट पार्टचे फोटो काढले अन्..
जिल्ह्यात ढगाळ वातावरण किंवा पावसाचा कोणताही अंदाज नसताना भर उन्हात बर्फाचा तुकडा पडला. त्यामुळे देवली गावात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बर्फाच्या तुकड्याचे नमुने देऊलकर यांनी संशोधनासाठी फ्रिजमध्ये ठेवले आहेत. जेणेकरून हा बर्फ गारांच्या स्वरूपात पडला आहे की यामागे अन्य काही कारण आहे?याची माहिती समोर येईल.