गेल्या 12 तासापासून रास्ता रोको, वाहनांच्या लांबच लांब रांगा, नाशिक गुजरात हायवेवर काय झालं?

गुजरात पेठ रस्ता काल म्हणजेच बुधवार सकाळपासून बंद करण्यात आला. या ठिकाणी पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Advertisement
Read Time: 2 mins
नाशिक:

नाशिक गुजरात हायवेवर पेठ जवळ रास्ता रोको करण्यात आला आहे. हा रास्ता रोको जवळपास 12 तास सुरू होता. बुधवारी सकाळी या रास्ता रोकोला सुरूवात झाली होती. त्यानंतर हायवेवर गाड्यांच्या 15 ते 20 किलोमिटरच्या रांगा लागल्या होत्या. आदिवासी 17 पेसा संवर्ग अंतर्गत पात्र  उमेदवारांचे नाशिकमध्ये असलेल्या आंदोलनाला, पेठ तालुक्यातील आदिवासी तरूणांनी साथ दिली. त्यासाठी त्यांनी रस्ता रोको केला.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गुजरात पेठ रस्ता काल म्हणजेच बुधवार सकाळपासून बंद करण्यात आला. या ठिकाणी पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आदिवासी बांधवांची मागणी आहे की या  17 पेसा संवर्ग अंतर्गत नोकर भरती पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र द्यावे. यासाठी आदिवासी बांधवांनी  जिल्हाधिकारी कार्यालय व आदिवासी विकास भवन यावर मोर्चा काढला होता.

ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांची सुरक्षा वाढवली; केंद्राकडून मिळाली झेड प्लस सुरक्षा, पण कारण काय?

त्यामुळे कालपासून पेठ तालुक्यातील आदिवासी बांधवांनी या युवकांना साथ दिली होती. त्यांनी बुधवारी सकाळपासून रस्ता रोको पुकारला होता. यामुळे शेकडो वाहने रस्त्यात अडकली होती. गुजरातमध्ये जाणारा भाजीपाला असो वा खाजगी बसेस असो या हायवेवर उडकून पडली होती. त्यामुळे नाशिक गुजरात हायवे बारा तासापासून ठप्प पडला होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अत्यावश्यक सेवा वाहने सुद्धा यात अडकून पडली होती. 

Advertisement