विशाल पाटील, प्रतिनिधी
BMC Budget : मुंबई महापालिकेच्या तोंडावर सादर झालेल्या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या झोपडपट्टीतील गाळेधारकांनाही आता कर भरावा लागणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही घोषणा केली आहे.
मुंबई महापालिकेत अडीच लाख झोपडपट्ट्या, त्यातील 20 टक्के झोपडपट्ट्यांमध्ये उद्योगधंदे दुकाने गोदाम हॉटेल्स अशा व्यवसायिक कारणासाठी वापर केला जातो. आतापर्यंत कर त्या ठिकाणी लावला जात नव्हता. या व्यवसायिक गाळेधारकांना कर निर्धारण करून मालमत्ता कर मुंबई महापालिका वसूल करणार आहे. त्यामधून 350 कोटींचा महसूल मिळणे अपेक्षित आहे, असं गगराणी यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
झोपडपट्टी गाळेधारकांकडून कर वसूल केला तरी ते सरसकट अधिकृत होणार नाहीत. हे गाळेधार मुंबई महापालिकेच्या वीज, पाणी तसंच अन्य सुविधा वापरतात त्यामुळे त्यांच्याकडून हा कर वसूल केला जाणार असल्याचं गगराणी यांनी स्पष्ट केलं आहे.
कचरा संकलन कर लावण्याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. टप्प्याटप्याने हा कर लावण्याचा विचार आहे, असं आयुक्तांनी यावेळी सांगितलं.
( नक्की वाचा : NDTV Exclusive : टॅक्सनंतर आता टोलमध्येही मिळणार सवलत! गडकरींनी दिले मोठे संकेत )
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
- मुंबई महापालिकेचा 2025-26 चा 74427.41 कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19 टक्के वाढ.
- गेल्या वर्षी 2024-25 च्या बजेटमध्ये 65 हजार 180 कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या.
- रस्ते व वाहतूक खात्याकरिता 2025- 26 या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 5100 कोटी इतकी तरतूद
- मुंबई मलनि:सारण प्रकल्पासाठी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) अर्थसंकल्पीय अंदाजात 5545 कोटींची तरतूद
- सागरी किनारा रस्ता प्रकल्पाअंतर्गत उत्तर वर्सोवा ते दहिसर आणि दहिसर ते भाईंदर लिंक रोडसाठी 5707 कोटींची तरदूत
- गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958 कोटी इतकी तरतूद
- मुंबई महापालिका आरोग्य खात्याचे बजेट 7379 कोटी
- मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टीतील गाळेधारकांना मुंबई महापालिका कर भरावा लागणार
- मुंबई महापालिका शिक्षण खात्याचं यंदाच्या वर्षीच बजेट 3955 कोटी रुपये