Nitin Gadkari Exclusive : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025-26 सालासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ करण्यात आला आहे. मोदी सरकारनं मध्यमवर्गाला दिलेला हा मोठा दिलासा आहे. त्यापाठोपाठ आता टोलमध्येही सरकार गुड न्यूज देणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी NDTV नेटवर्कला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये याबाबतचे संकेत दिले आहेत.
सरकारच्या योजनेतून लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं गडकरी यांनी सांगितलं. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रदूषण आणि वाहतूकीची समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अनेक योजना सुरु केल्या जाणार आहेत. त्यासाठी त्यांच्या मंत्रालयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे, असं गडकरी यांनी स्पष्ट केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टोल समाप्त होणार?
नव्या योजनेमुळे टोल समाप्त होणार का? या प्रश्नावर गडकरी यांनी सस्पेंस कायम ठेवला. या योजनेची घोषणा लवकरच केली जाईल असं त्यांनी सांगितलं. सरकार उपग्रहावर आधारित टोल पद्धतीवर काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबतही निर्णय होणार आहे. पण, हा निर्णय या योजनेपासून वेगळा आहे. आगामी काळात टोल देणाऱ्यांची नाराजी दूर केली होईल, असं गडकरी यावेळी म्हणाले.
( नक्की वाचा : New Income Tax Bill : कर विधेयकात होणार 64 वर्षांनी बदल, वाचा काय असेल नव्या कायद्याचे वैशिष्ट्य )
गडकरींनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे
- पाच वर्षांच्या आत दिल्लीमध्ये एकही डिझेल बस दिसणार नाही. सर्व इलेक्ट्रिक बस धावतील.
- माझ्याकडे 100 टक्के इथेनॉलवर चालणारं वाहन आहे.
- टाटा, सुझुकी, महिंदा हे देखील इथेनॉलवर चालणारी वाहनं आणणार आहेत.
- डिसेल, पेट्रोल कार ट्रक-बसची किंमत एक होईल.
- आगामी काळात देशात 1 लाख इलेक्ट्रिक बस तयार होतील.
मास रॅपिड ट्रान्सपोर्ट आणि रोपवे केबलवरही आम्ही काम करत आहोत. राज्य सरकारकडून आम्हाला 360 प्रस्ताव मिळाले आहेत. 6 महिन्यांमध्ये आम्ही 50 प्रकल्प सुरु करत आहोत. आगामी काळात आम्ही आकाशात चालणाऱ्या बसवरही काम करत आहोत. त्यामुळे वाहतुकीची समस्या कमी होऊ शकेल, असं गडकरी यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world