2 hours ago

Maharashtra 29 Municipal Mayor reservation 2026 lottery: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज गुरुवारी मंत्रालयात ऐतिहासिक सोडत काढली जाणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात सुरू होणाऱ्या या प्रक्रियेमुळे राज्यातील 29 शहरांच्या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे.

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील 29 महापालिकांच्या पहिल्या अडीच वर्षांसाठीच्या महापौरपदाचे आरक्षण निश्चित केले जाईल. यासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जात असून संपूर्ण प्रक्रिया चक्राकार पद्धतीने पार पडणार आहे.
 

Jan 22, 2026 18:13 (IST)

Mayor Reservation Lottery Live: नागपूरमध्ये महापौरपदी कोण? शिवानी दाणी यांच्या तुफान चर्चा

राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आज महापौरपदासाठीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे महापौरपदावर विराजमान होण्यासाठी अनेक उमेदवारांची रस्सीखेंच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर महानगरपालिकेची राज्यभरात चर्चा आहे. याठिकाणी महापौर आरक्षण सर्वसाधारण महिला असल्याने महापौरपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच भाजप नगरसेविका शिवानी दाणी यांची जोरदार चर्चा रंगली आहे.

Jan 22, 2026 15:22 (IST)

Navi Mumbai Mayor Live Update : नवी मुंबईला मिळणार महिला महापौर

नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद यंदा खुला प्रवर्ग (महिला)यासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईला पुन्हा एकदा महिला महापौर मिळणार आहे. सलग पाचव्यांदा शहराच्या प्रथम नागरिकपदी महिला विराजमान होणार आहे. महापौरपदासाठी भाजपच्या नेत्रा शिर्के,शिवसेनेच्या माधुरी सुतार आणि वैष्णवी नाईक या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. अखेर कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jan 22, 2026 14:06 (IST)

nanded News Live : नांदेड महापालिकेसाठी 4 जणांची नावे चर्चेत

नांदेड महापालिकेत 81 पैकी 45 जागा जिंकून भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. आज आरक्षण सोडतीत नांदेड माहापलिकेचे महापौरपद सर्व साधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. भाजपाकडून सर्व साधारण महिला प्रवर्गातून एकूण 14 उमेदवार निवडून आले आहेत. त्यापैकी ज्योती कल्याणकर, सुदर्शना खोमने , वैशाली देशमुख आणि कविता मुळे या चार जणांची नावे सद्या चर्चेत आहेत.

Jan 22, 2026 14:03 (IST)

Vasai-Virar News: वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ही नावे चर्चेत

वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. 

यामुळे वसई विरार पालिकेच्या संभाव्य महापौर म्हणून बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आणि माजी स्थायी समिती सभापती आजीव पाटील, माजी महापौर प्रवीण शेट्टी, तिसऱ्यांदा निवडून आलेले कन्हैयाबेटा भोईर, सौ. रंजना लाडक्या थालेकर तसेच, प्रकाश रॉड्रिंक्स आणि माजी स्थायी समिती सभापती प्रफुल्ल साने यांची नावं चर्चेत आहेत.  या नावांपैकी कुणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडेल ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Advertisement
Jan 22, 2026 13:49 (IST)

Thane Live Update: ठाण्यात महापौरपदाकरता भाजपा देखील आग्रही, कुणाचं नाव चर्चेत

ठाण्यात महापौरपदाकरता भाजपा देखील आग्रही असल्याचे समोर आले आहे. महापौरपदासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. ⁠आमच्याकडे देखील एससी प्रवर्गाचे उमेदवार निवडून आले आहेत.  ⁠⁠प्रभाग क्रमांक 15 मधून सुरेश कांबळे निवडून आले आहेत.  कोअर कमिटी ठरवेल कोणाचे नाव निश्चित करायचे.  ⁠पण आमची मागणी आहे आम्हाला अडीच वर्षे महापौरपद द्यावे, असं निरंजन डावखरे यांनी म्हटलं आहे.

Jan 22, 2026 13:42 (IST)

Jalgaon Live Update: जळगावमध्ये महापौरपदासाठी कुणाची नावे चर्चेत?

जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर होताच दिग्गजांना अनपेक्षित धक्का बसला आहे. ओबीसी महिला प्रवर्गासाठी महापौरपद राखीव झाल्याने उज्वला बेंडाळे, दीपमाला काळे, वैशाली पाटील, गायत्री राणे, माधुरी बारी यांचे नाव महापौरपदासाठी चर्चेत आहेत. उज्वला बेंडाळे व दीपमाला काळे या दोघीही सलग तीन वेळा निवडून आल्याने या दोघींमध्ये महापौरपदासाठी चुरस दिसू शकते. तर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचे निकटवर्तीय अमित पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील यांचे देखील नाव महापौर पदासाठी पुढे येत आहे. 

Advertisement
Jan 22, 2026 13:31 (IST)

Sangli News: सांगलीत महापौरपदासाठी कुणाची नावे चर्चेत?

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौरपद खुले असणार आहे. याठिकाणी आता भाजपामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. भाजपाचे माजी स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी आणि माजी सभापती निरंजन आवटी या दोघांची नावे महापौरपदासाठी चर्चेत आहेत. मात्र महापालिकेत काठावर बहुमत असणाऱ्या भाजपच्या सत्तेचा गणितानंतर महापौर कोण असणार हे स्पष्ट आहे.

Jan 22, 2026 13:28 (IST)

Solapur Live Update: सोलापूरमध्ये भाजपाकडून विनायक कोड्याल हे महापौरपदासाठी प्रमुख दावेदार

सोलापूरमध्ये भाजपाकडून विनायक कोड्याल हे महापौरपदासाठी प्रमुख दावेदार

विनायक कोड्याल सोलापूर महानगरपालिकेत सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आहेत.

चौथ्यांदा सोलापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत.  

आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत. 

महापौरपदासाठी चर्चेतील नावे

विनायक कोड्याल 

 प्रथमेश कोठे 

 डॉ. किरण देशमुख 

 नरेंद्र काळे

 अनंत जाधव

Advertisement
Jan 22, 2026 13:28 (IST)

Solapur Live Update: सोलापूरमध्ये भाजपाकडून विनायक कोड्याल हे महापौरपदासाठी प्रमुख दावेदार

सोलापूरमध्ये भाजपाकडून विनायक कोड्याल हे महापौरपदासाठी प्रमुख दावेदार

विनायक कोड्याल सोलापूर महानगरपालिकेत सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आहेत.

चौथ्यांदा सोलापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत.  

आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत. 

Jan 22, 2026 13:26 (IST)

Pune Live Update: पुणे महानगरपालिका महापौरपदासाठी ही नावे चर्चेत

पुणे महानगरपालिकेसाठी महापौरपद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे यांची नावे महापौरपदासाठी चर्चेत

मानसी देशपांडे यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. त्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक आहेत. 

मंजुषा नागपुरे यांनी बिनविरोध विजय मिळवला होता. 

रंजना टिळेकर या आमदार योगेश टिळेकर यांच्या आई आहेत, त्यांची ही सहावी टर्म आहे.

Jan 22, 2026 13:23 (IST)

Mumbai Live Update: मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी कुणाची नावे चर्चेत?

मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी कुणाची नावे चर्चेत? 

  • तेजस्वी घोसाळकर
  • अलका केरकर 
  • अनुराधा घोडके
  • रितू तावडे 
  • राजश्री शिरवाडकर 
  • राखी जाधव
  • गौरवी शिवलकर

Jan 22, 2026 13:04 (IST)

LIVE Uodate: छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौरपदासाठी कुणाची नावे चर्चेत?

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौरपदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजप पक्ष कार्यालयात इच्छुकांची मोठी रांग

भाजपकडून महापौरपदासाठी इच्छुकांची नावे

  1. समीर राजुरकर
  2. अनिल मकरीय
  3. राज वानखेडे
  4. प्रमोद राठोड
  5. शिवाजी दांडगे
  6. सुरेंद्र कुलकर्णी
  7. विजय औताडे
  8. जालिंदर शेंडगे

Jan 22, 2026 13:01 (IST)

LIVE Update: राज्यात कुठे-कुठे महिला महापौर बसणार?

कुठे-कुठे महिला महापौर बसणार? 

अनुसूचित जाती (SC)

जालना महापालिका - (महिला)

लातूर महापालिका - (महिला)

OBC - 08

अकोला महापालिका - (महिला)

अहिल्यानगर महापालिका - (महिला)

चंद्रपूर महापालिका - (महिला)

जळगाव महापालिका - (महिला)

सर्वसाधारण खुला प्रवर्ग (OPEN) - 17

मुंबई महापालिका (महिला)

नवी मुंबई महापालिका (महिला)

पुणे महापालिका (महिला)

नाशिक महापालिका (महिला)

मिरा-भाईंदर महापालिका  (महिला)

मालेगाव महापालिका (महिला)

नागपूर महापालिका (महिला)

नांदेड-वाघाडा महापालिका  (महिला)

धुळे महापालिका  (महिला)

Jan 22, 2026 12:52 (IST)

Mumbai Live Update: ठाकरे गटाचा लॉटरी प्रक्रियेवर बहिष्कार

ठाकरे गटाचा लॉटरी प्रक्रियेवर बहिष्कार

सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ पाहून ही लॉटरी काढण्यात आली आहे, किशोरी पेडणेकर यांचा आरोप. अनुसूचित जाती, अनुसूचि जमाती, ओबीसींवर अन्याय केला आहे. जाणूनबुजून, ठरवून केलेली ही लॉटरी आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

Jan 22, 2026 12:46 (IST)

LIVE Update: मुंबई महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी राखीव

मुंबई महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी राखीव 

Jan 22, 2026 12:44 (IST)

Live Update: ठाण्यात महापौरपदासाठी कुणाची नावे चर्चेत?

ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाकरिता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका विमल भोईर यांच्यासह पहिल्यांदा निवडून आलेल्या डॉ. दर्शना जानकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर पुरुषांमध्ये गणेश कांबळे यांच्या नावाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Jan 22, 2026 12:42 (IST)

Live Update: 29 महापालिकांमध्ये महापौरपदासाठी आरक्षण जाहीर

29 महापालिकांमध्ये महापौरपदासाठी आरक्षण जाहीर 

अनुसूचित जमाती (ST) - 01

  • कल्याण डोंबिवली 

अनुसूचित जाती (SC) - 03

  • ठाणे महापालिका  
  • जालना महापालिका - (महिला)
  • लातूर महापालिका - (महिला)

OBC - 08

  • पनवेल महापालिका
  • इचलकरंजी महापालिका 
  • अकोला महापालिका - (महिला)
  • अहिल्यानगर महापालिका - (महिला)
  • उल्हासनगर महापालिका 
  • कोल्हापूर महापालिका 
  • चंद्रपूर महापालिका - (महिला)
  • जळगाव महापालिका - (महिला)

सर्वसाधारण खुला प्रवर्ग (OPEN) - 17

  • मुंबई महापालिका (महिला)
  • नवी मुंबई महापालिका (महिला)
  • पुणे महापालिका (महिला)
  • नाशिक महापालिका (महिला)
  • मिरा-भाईंदर महापालिका  (महिला)
  • मालेगाव महापालिका (महिला)
  • भिवंडी महापालिका
  • परभणी महापालिका 
  • पिंपरी-चिंचवड महापालिका - (महिला)
  • सांगली-मिरज-कुपवाड महापालिका 
  • अमरावती महापालिका - (महिला)
  • सोलापूर महापालिका 
  • संभाजीनगर महापालिका 
  • नागपूर महापालिका (महिला)
  • नांदेड-वाघाडा महापालिका  (महिला)
  • वसई-विरार महापालिका 
  • धुळे महापालिका  (महिला)

Jan 22, 2026 12:36 (IST)

Mayor Reservation Lottery: खुल्या प्रवर्गातील खालील महानगरपालिकांमध्ये महापौरपद हे महिलांसाठी आरक्षित असणार आहे

Mayor Reservation Lottery :  खुल्या प्रवर्गातील खालील महानगरपालिकांमध्ये महापौरपद हे महिलांसाठी आरक्षित असणार आहे

मुंबई (महिला)

नवी मुंबई

उल्हासनगर 

मिरा – भाईंदर 

वसई – विरार 

नाशिक 

मालेगाव 

धुळे 

पुणे 

पिंपरी – चिंचवड

सोलापूर 

सांगली – मिरज – कुपवाड महापालिका

छत्रपती संभाजीनगर 

नांदेड वाघाळा महापालिका

परभणी 

अमरावती 

नागपूर

Jan 22, 2026 12:22 (IST)

Mayor Reservation Lottery LIVE : ओबीसी प्रवर्गातील खालील महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी महापौरपद आरक्षित करण्यात आले आहे.

Mayor Reservation Lottery : ओबीसी प्रवर्गातील खालील महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी महापौरपद आरक्षित करण्यात आले आहे. 

 

जळगाव महापालिका ( महिला )

चंद्रपूर महापालिका ( महिला )

अहील्यानगर महापालिका ( महिला )

अकोला महापालिका ( महिला )

Jan 22, 2026 12:18 (IST)

Mayor Reservation Lottery LIVE: कोणकोणत्या महापालिकांमध्ये OBC महापौर, यादी जाहीर

Mayor Reservation Lottery :  8 महानगरपालिकांचा महापौर हा ओबीसी प्रवर्गातून होणार असून या महानगरपालिकांची यादी खालीलप्रमाणे आहे. 

  1. पनवेल
  2. इचलकरंजी
  3. चंद्रपूर
  4. जळगाव
  5. अकोला
  6. अहिल्यानगर
  7. उल्हासनगर
  8. कोल्हापूर

Jan 22, 2026 12:13 (IST)

KDMC Live: कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर शिवसेनेचाच होणार

Who Will Become Mayor of KDMC? -केडीएमसीत महापौर शिवसेनेचाच होणार, आरक्षणासाठीच्या लॉटरीमुळे चित्र झाले स्पष्ट. कल्याण डोंबिवलीचा महापौर हा अनुसूचित जमाती (Schedule Tribe) चा असणार. अनुसूचित जमातीचे तीनही उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेचे. किरण भांगले, हर्षाली थविल या दोघांमध्ये रस्सीखेच. मनसेच्या शीतल मंडारीदेखील अनुसूचित जमातीच्या असल्याने स्पर्धेत.

Jan 22, 2026 12:08 (IST)

Mayor Reservation Lottery LIVE: ठाणे,जालना,लातूर या 3 महानगरपालिकांमध्ये अनुसूचित जातीचा (Schedule Caste) महापौर होणार

Mayor Reservation Lottery:  ठाणे,जालना,लातूर  या 3 महानगरपालिकांमध्ये अनुसूचित जातीचा (Schedule Caste) महापौर होणार

Jan 22, 2026 12:06 (IST)

Mayor Election Live Update: महापौर आरक्षण सोडतीवर ठाकरे गटाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांचा आक्षेप

Mayor Reservation Lottery: शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी लॉटरी प्रक्रियेवर आक्षेप घेतला. फोल्ड केलेली चिठ्ठी पुन्हा वापरल्याबद्दल घेतला आक्षेप, नवा पेपर नाही का अशी केली विचारणा.

Jan 22, 2026 11:59 (IST)

KDMC Live Update: कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी एसटी प्रवर्गासाठी महापौरपद जाहीर

कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी एसटी प्रवर्गासाठी महापौरपद जाहीर

Jan 22, 2026 11:55 (IST)

Maharashtra Mayor Reservation: 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी खालीलप्रमाणे आरक्षण असणार

Maharashtra Mayor Reservation: 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी खालीलप्रमाणे आरक्षण असणार

  • सर्वसाधारण (Open) - 17
  • ओबीसी (OBC)- 8
  • अनुसूचित जाती (Schedule Caste) - 3
  • अनुसूचित जमाती (Schedule Tribe)-1

Jan 22, 2026 11:24 (IST)

LIVE Update: अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये भाजप आणि एमआयएमची युती

अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये भाजप आणि एमआयएमची युती

समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमची एकमेकांना साथ

एमआयएमच्या नगरसेवकाला मिळाले शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद

एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत

अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण

Jan 22, 2026 11:12 (IST)

Nashik Live Update: नाशिक महापालिकेतील आजवर झालेले महापौर आरक्षण

नाशिक महापालिकेत 1997 पर्यंत महापौरपदासाठी आरक्षण नव्हते. 

1997 मध्ये महापौरपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले.

1998 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी

1999 मध्ये सर्वसाधारण महिला राखीव गटासाठी

 2002 मध्ये सर्वसाधारण

 2005 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 

2007 मध्ये सर्वसाधारण आरक्षण निघाले

 2009 मध्ये अनुसूचित जाती

 2012 मध्ये सर्वसाधारण प्रवर्ग

 2014 मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग 

2017 मध्ये अनुसूचित जमाती

2019 मध्ये सर्वसाधारण आरक्षण निघाले

Jan 22, 2026 10:53 (IST)

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली

पुणे जिल्हा परिषदेच्या 73 जागा साठी 597 उमेदवारी अर्ज दाखल

चार वर्षानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज केला दाखल

पंचायत समितीच्या 146 जागांसाठी 907 उमेदवारांनी 166 अर्जउमेदवारांनीआहेत

आज अर्जांची छाननी होणार आहे 27 जानेवारीला माघार घेण्याची मुदत आहे

Jan 22, 2026 09:18 (IST)

महायुतीची महापालिकेतील महत्वाच्या पदांबाबत अंतिम वाटाघाटी जवळपास निश्चित

मुंबई महापालिका निवडणुकीत बाजी मारलेल्या भाजप-शिवसेना पक्षांमध्ये पालिकेतील महत्वाच्या पदांबाबत अंतिम वाटाघाटी जवळपास निश्चित झाल्याचे कळते.

शिवसेनेकडून भाजपकडे महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी केली जात आहे.

तर महत्वाच्या समित्यांपैकी शिवसेनेकडून सुधार किंवा शिक्षण समितींची मागणी केली जात आहे

दरम्यान या वाटाघाटीत मुंबईत महापौर हा भाजपचा बसल्यास शिंदेंच्या शिवसेनेला स्थायी समिती अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.

तर भाजपकडून सुधार समिती आणि आरोग्य समिती स्वत:कडे ठेवली जाणार असल्याचे कळते. 

तर त्या बदल्यात शिवसेनेला शिक्षण, विधी, बाजार, उद्यान समिती दिली जाणार असल्याचे कळते. 

Jan 22, 2026 07:09 (IST)

Mayor Reservation: आरक्षणाची सोडत कशी निघणार?

  • प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या जातील.
  • अनुसूचित जाती (SC) व जमाती (ST) सर्वप्रथम या प्रवर्गांची सोडत निघेल.
  • ओबीसी (OBC):  त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सोडत काढली जाईल.
  • खुला प्रवर्ग (Open): शेवटी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण स्पष्ट होईल.
  • महिला आरक्षण: प्रत्येक प्रवर्गात 50% जागा महिलांसाठी राखीव असतील, ज्याची स्वतंत्र सोडत काढली जाईल.

Jan 22, 2026 07:07 (IST)

कोणत्या महापालिकांसाठी आरक्षण सोडत?

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, भिवंडी-निजामपूर, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, मालेगाव, धुळे, जळगाव, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर, नांदेड.

Jan 22, 2026 07:06 (IST)

Mayor Reservation: आरक्षण सोडतीची प्रक्रिया चक्राकार पद्धतीने पार पडणार

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील 29 महापालिकांच्या पहिल्या अडीच वर्षांसाठीच्या महापौरपदाचे आरक्षण निश्चित केले जाईल. यासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जात असून संपूर्ण प्रक्रिया चक्राकार पद्धतीने पार पडणार आहे.

Topics mentioned in this article