जाहिरात

BMC News: मुंबईच्या महापौरांचा थाट! बंगल्याच्या दुरूस्तीचा घातलाय घाट, खर्च 4 पटीने वाढला

महापौरांच्या बंगल्याचे आधुनिक सुविधांसह स्वयंपाकघर व डायनिंग एरियाचे नूतनीकरण ही होणार आहे.

BMC News: मुंबईच्या महापौरांचा थाट! बंगल्याच्या दुरूस्तीचा घातलाय घाट, खर्च 4 पटीने वाढला
  • मुंबई महापौरांच्या बंगल्यासाठी 2026-27 आर्थिक वर्षात तब्बल 3.40 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला
  • महापौर बंगल्याच्या खर्चात 2018-19 पासून 4 पट वाढ झाली असून 85 लाखांवरून 3.40 कोटींचा प्रस्ताव आला आहे
  • या खर्चात बंगल्याच्या अंतर्गत कार्यालयांचे स्थलांतर, फर्निचर दुरुस्ती, शौचालय नूतनीकरण समावेश आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

महापौरांच्या शासकीय निवासस्थानाच्या बंगल्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षात तब्बल 3.40 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ही बाब माहिती अधिकारांतर्गत उघड झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना ही माहिती दिली आहे. महापौर बंगल्याच्या खर्चात 4 पट वाढ झाली आहे. तो  85 लाखांवरून थेट 3.40 कोटींचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. त्यामुळे ही जनतेच्या पैशांची उळपट्टी असल्याची टीका होत आहे.  

उपलब्ध आकडेवारीनुसार, मागील काही वर्षांत महापौर बंगल्यावरील खर्च अत्यंत मर्यादित होता. वर्ष 2018-19 मध्ये एकूण 85.87 लाख रुपये खर्च झाला होता. त्यानंतर वर्ष 2019-20 मध्ये हा खर्च 5.88 लाख रुपये झाला. तर 2020-21 आणि 2022-23 मध्ये अनुक्रमे 2.93 लाख आणि 2.92 लाख रुपये इतका नगण्य राहिला. या तुलनेत 2026-27 साठी प्रस्तावित 340 लाख रुपये (3.40 कोटी) खर्च हा 50 ते 100 पट वाढ दर्शवतो.

नक्की वाचा - Shivsena UBT: विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर, 'या' नावामुळे पेच निर्माण होणार?

पालिकेच्या नोंदीनुसार 16 फेब्रुवारी 2026 रोजी महापौरांनी बंगल्याला भेट देत आत व बाहेरील परिसरात मोठे बदल सुचवले आहेत. गोपनीयतेच्या कारणास्तव तळमजल्यावरील अंतर्गत कार्यालय व कॉन्फरन्स हॉल बंगल्याबाहेर हलवून आवारात तात्पुरती रचना उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बंगल्यातील प्रस्तावित कामात आतील फर्निचरची संपूर्ण दुरुस्ती, सर्व शौचालयांचे टाईल्स, फिटिंग्ज व WC बसवून नूतनीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर अतिरिक्त प्रसाधनगृहाची व्यवस्था, तळमजल्यावर अतिथी शयनकक्ष (Guest Bedroom), ‘हेरिटेज' शैलीतील प्रकाश दिवे व झुंबरे, कॉन्फरन्स रूमचे अतिथी दिवाणखान्यात रूपांतर करण्यात येणार आहे. आधुनिक सुविधांसह स्वयंपाकघर व डायनिंग एरियाचे नूतनीकरण ही होणार आहे. 

नक्की वाचा - Cabinet decision:'साता समुद्रापार महापुरूषांच्या विचारांचा जागर' राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय

तळमजल्यावरील फरशीचे इटालियन संगमरवरामध्ये रूपांतर, ‘हेरिटेज' शैलीतील व्हेनेशियन ब्लाइंड्स बसविणे, अतिथींसाठी अतिरिक्त प्रसाधनगृह ही कामे आहेत. आवारातील प्रस्तावित कामात महापौर कार्यालयासाठी तात्पुरती वास्तू उभारणे, पायवाटा व बागेचे आधुनिकीकरण (Upgradation), दृश्य व ध्वनी अडथळे (Vision & Sound Barrier) उभारणे ही कामे आहेत. सध्याच्या स्थितीत राहण्यायोग्य असलेल्या हेरिटेज बंगल्यावर कोट्यवधी खर्च करण्याचे प्रयोजन काय? असा सवाल अनिल गलगली यांनी केला आहे. जी कामे सुचविली आहेत त्यातील अधिकांश कामे जानेवारी 2026 रोजी पालिकेने केली आहेत.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com