BMC School : मुंबई महापालिकेच्या मराठी शाळेत पहिली ते सातवी, एक वर्ग आणि 1 शिक्षक! कधी जाग येणार?

BMC School : हिंदी सक्तीच्या विरोधात राजकारण तापलंय. पण, राजधानी मुंबईतील मराठी शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
BMC School : मुंबईतील मराठी शाळांच्या परिस्थितीबाबत कधी जाग येणार आहे?
मुंबई:

विशाल पाटील 

राज्यात सध्या हिंदी सक्तीचा वाद चांगलाच उफाळला आहे. या विषयावर मनसेकडून 5 जुलै मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात राजकारण तापलंय. पण, राजधानी मुंबईतील मराठी शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पहिली ते सातवी एकच शिक्षक 

मुंबईत अनेक शाळांमध्ये एकाच वर्गात पहिली ते सातवीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर काही शाळांमध्ये एकच शिक्षक पहिली ते सातवीपर्यंत शिकत आहेत. शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी नको, अशी मागणी जोर ठरु लागली आहे. पण, त्याचवेळी मुंबईतील मराठी शाळांची अवस्था बिकट आहेत. या शाळा येत्या काही वर्षांमध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 

गेल्या 13 वर्षात 131 शाळा मराठी शाळा बंद पडल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये 45 टक्के घट तर शाळेतील शिक्षकांची संख्याही कमी होत आहे. 
मुंबईत 2024-25 मध्ये महापालिकेच्या  254 मराठी शाळा आहेत. त्यामध्ये 36205 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर एकूण 926 शिक्षक कार्यरत आहेत. 

( नक्की वाचा : Hindi Language Controversy : ठाकरे बंधू एकत्र येणार, पण मोर्च्याची वेळ आणि ठिकाण बदलणार? कसा निघणार तोडगा? )

गेल्या पाच वर्षात मराठी शाळांची आणि शिक्षकांची स्थिती

२०१९-२० मराठी शाळांची संख्या - २८३ तर शिक्षक संख्या १७२१ 

२०२०- २१ मराठी शाळांची संख्या - २७९ तर शिक्षक संख्या१५८३ 

२०२१ - २२ मराठी शाळांची संख्या - २७१ तर शिक्षक संख्या १३६७

२०२२-२३ मराठी शाळांची संख्या - २६५ तर शिक्षक संख्या ११४९

२०२३-२४ मराठी शाळांची संख्या - २६२ तर शिक्षक संख्या १०११

२०२४-२५ मराठी शाळांची संख्या - २५४ तर शिक्षक संख्या ९२६

दादरमध्येही भीषण परिस्थिती!

मुंबईतील मराठी भाषिकांचं केंद्र समजल्या जाणाऱ्या दादरमधील नायगावमध्येही परिस्थिती वेगळी नाही. दादरमधील नायगावमध्ये  असलेली सरस्वती प्राथमिक आणि माध्यमिक मराठी शाळा बंद पडलेली आहे. या शाळेची अवस्था इतकी दयनीय झाले की या शाळेचे रूपांतर व्यावसायिक गाळे स्वरूपात झाले आहे. तर दादरच्याच गोखले रोड शाळेत  १ ली ते ७ वी चे विद्यार्थी एकाच वर्गात शिक्षण घेत आहेत.

Advertisement

 मराठी शाळा बंद पडण्याची अनेक कारणे आहेत. प्रत्येक पालकाला वाटतं माझी मुलं-मुली इंग्रजी शाळेत शिकली पाहिजेत तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत मराठी शाळांमध्ये विद्यार्थीच नसल्यामुळे या शाळा बंद पडतात हे सुद्धा तितकच वास्तव आहे. त्यामुळे फक्त मराठी भाषा वाचवण्याच्या नादात मराठी शाळा मरतील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
 

Topics mentioned in this article