Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; वाचा अटी-शर्ती

Govt Jobs: मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तिन्ही खंडपीठांसाठी लिपिक, शिपाई, लघुलेखक आणि चालक यासह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bombey High Cpourt

Bombay High Court Recruitment 2025: सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरीचा संधी आहे. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तिन्ही खंडपीठांसाठी लिपिक, शिपाई, लघुलेखक आणि चालक यासह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

भरतीची माहिती

  • एकूण 2381 पदांची भरती केली जाणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवार हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज शकतात.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांना 5 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करावा लागेल. यानंतर अर्ज प्रक्रिया बंद होईल.

पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अट

क्लर्क

  • शिक्षण- पदवी
  • 40 WPM (शब्द प्रति मिनिट) टायपिंग स्पीड

शिपाई

  • मराठी वाचता आणि लिहिता येणे आवश्यक

स्टेनोग्राफर (लोअर)

  • शिक्षण- पदवी
  • शॉर्टहँड 80 WPM + टायपिंग 40 WPM

स्टेनोग्राफर (हायर)

  • शिक्षण- पदवी
  • शॉर्टहँड 100 WPM + टायपिंग 40 WPM

ड्रायव्हर

  • शिक्षण- 10वी पास
  • LMV लायसन्स + 3 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा किती?

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया

  • सर्व श्रेणीतील (General/OBC/EWS/SC/ST/PwD) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
  • उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर केली जाईल.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिक माहितीसाठी हायकोर्टाची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे.

टिफिकेशन

Topics mentioned in this article