VIDEO : बॅडमिंटन खेळताना विजेचा शॉक; 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

यश यादव असं मृत मुलाचं नाव आहे. यश सोसायटीमध्ये त्याच्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. दरम्यान, त्याचा शटलकॉक पहिल्या मजल्यावरील घराच्या खिडकीत अडकला.

जाहिरात
Read Time: 1 min

Mumbai News : मुंबईतील नायगावमध्ये 16 वर्षीय मुलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत असताना पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या खिडकीत शटलकॉक अडकला. शटलकॉक बाहेर काढण्यासाठी खिडकीतून चढत असताना त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो बेशुद्ध पडला. त्याच्या मित्रांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.

यश यादव असं मृत मुलाचं नाव आहे. यश सोसायटीमध्ये त्याच्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. दरम्यान, त्याचा शटलकॉक पहिल्या मजल्यावरील घराच्या खिडकीत अडकला. यश शटलकॉक बाहेर काढण्यासाठी खिडकीवर चढला. दरम्यान, त्याला विजेचा धक्का बसला आणि तो खिडकीला अडकला. 

पाहा VIDEO

यशच्या एका मित्राने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु विजेच्या धक्क्यामुळे ते दोघेही खाली पडले. यानंतर, इतर मुले देखील आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एसीमधून येणारा करंट इतका जोरदार कसा झाला आणि याला कोण जबाबदार आहे याचा तपास सुरू आहे.

Topics mentioned in this article