Budget 2026 Update : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज त्यांचा नववा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात कोणाला काय वाटप केले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पापूर्वी निर्मला यांनी राष्ट्रपतींना त्यांचे हिशोब पत्र सादर केले. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना दहीसाखर देऊन अभिवादन केलं. अर्थमंत्री लोकसभेत अर्थसंकल्प वाचत आहेत.
यादरम्यान त्यांनी मोठी घोषणा केली आहे. रेल्वेचा प्रवास अधिक जलद करण्यासाठी हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर्स तयार करण्यात येणार आहे. यामुळे दोन शहरांमध्ये प्रवास अधिक जलद होईल आणि नागरिकांचा बराच वेळ वाचणार आहे. (Mumbai-Pune Highspeed:)
7 हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर्स तयार करणार (Mumbai-Pune Highspeed Railway)
मुंबई-पुणे
पुणे-हैदराबाद
हैदराबाद-बंगळुरू
दिल्ली-वाराणसी
वाराणसी -सिलिगुडी
हाय-स्पीड रेल्वे कॉरीडॉर म्हणजे काय?
हाय-स्पीड रेल्वे सामान्य ट्रेनपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. या गाड्यांसाठी पूर्णपणे स्वतंत्र मार्ग असतात. यावर इतर कोणतीही मालवाहतूक किंवा पॅसेंजर ट्रेन चालवली जात नाही. हे ट्रॅक शक्यतो जमिनीपासून उंचावर किंवा बोगद्यात असतात, जेणेकरून मध्ये कोणतेही अडथळे (प्राणी, माणसे किंवा वाहने) येणार नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world