- किनारपट्टी, डोंगराळ आणि औषधी शेतीसाठी लक्ष्यित योजना करण्यावर भर
- काजू-नारळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर
- डोंगराळ भागात जर्दाळू, अक्रोड आणि बदाम लागवडीसाठी विशेष प्रोत्साहन योजना राबवण्यात येतील
Budget 2026 News: कृषी क्षेत्र भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये शेती-खळे या संकल्पनेवर मोठा भर दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा करताना स्पष्ट केले की, किनारपट्टीवरील काजू-नारळ उत्पादक शेतकरी असो, डोंगराळ भागातील जर्दाळू-अक्रोड-बदाम उत्पादक असो किंवा औषधी शेती करणारे शेतकरी असो प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र तसेच लक्ष्यित केंद्रीत योजना तयार करण्यात आल्या आहेत. बजेटनुसार भारत आपल्या विशेष पिकांना जागतिक बाजारात प्रीमियम ब्रँड म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने काम करणार आहे.
शेतकऱ्यांसाठी बजेटमधील प्रमुख घोषणा | Budget 2026
1. किनारी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
काजू आणि नारळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्यात येणार आहे, ज्यामुळे किनारीपट्टी भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. तसेच भारतीय काजूला ‘प्रीमियम ब्रँड' म्हणून विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे, यामुळे निर्यात वाढेल.
2. पर्वतीय राज्यांसाठी विशेष पॅकेज
डोंगराळ भागात जर्दाळू, अक्रोड आणि बदाम या पिकांच्या लागवडीला चालना दिली जाईल. या पिकांसाठी विशेष प्रोत्साहन योजना राबवण्यात येतील, जेणेकरून कठीण भौगोलिक परिस्थितीतही शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकेल.
3. कोको आणि चंदन शेतीबाबत मोठी घोषणा
कोकोच्या शेतीला प्रोत्साहन दिले जाईल, ज्यामुळे चॉकलेट आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्राला स्थानिक उत्पादनाचा आधार मिळेल. चंदनाच्या लागवडीसाठी राज्ये आणि शेतकऱ्यांना विशेष सहाय्य दिले जाईल, जेणेकरून ही महागडे आणि मागणी असलेली पीक पुन्हा एकदा भारताची ओळख बनू शकेल.
(नक्की वाचा: Income Tax: आता उत्पन्न लपवलं तर जेल नाही; टॅक्स रिटर्नसाठीही मिळणार जास्त वेळ, वाचा बजेटमधील मोठे निर्णय)4. शेतकरी आणि महिला उद्योजकांना AIचे नवे बळ
भारत-विस्तार: बहुभाषिक AI टुल शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवेल आणि विशिष्ट सल्ला देऊन योग्य निर्णय घेण्यास तसेच जोखीम कमी करण्यास मदत करेल.
ग्रामीण महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांसाठी SHE-मार्ट्स: महिलांना स्वतःचे उद्यम उभारण्यास आणि मालक होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Budget 2026: काय स्वस्त? काय महाग? दारू महागली, विमानाचे पार्ट स्वस्त, पाहा संपूर्ण लिस्ट5. औषधी शेतीला थेट लाभ उच्च दर्जाच्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी विशेष रणनीती तयार करण्यात आली आहे. यामुळे औषधी वनस्पतींची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न थेट वाढेल, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात या उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे.