Pune News: मोशी दुर्घटना, 40 तास उलटले, 'त्या' लोकांचा श्वास अजूनही कोंडलेलाच, रेस्क्यू टीमने आखलाय मोठा प्लॅन

मोशी कचरा डेपो येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारती जवळचा मलबा हटवून इमारतीत प्रवेश करण्याचा मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. विविध यंत्रसामग्रीच्या माध्यमातून या कामाला गती देण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune Moshi Garbage Depot Incident latest Update
पुणे:

Moshi Garbage Depot Incident News Today : मोशी कचरा डेपो येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारती जवळचा मलबा हटवून इमारतीत प्रवेश करण्याचा मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. विविध यंत्रसामग्रीच्या माध्यमातून या कामाला गती देण्यात आली आहे. इमारतीत अडकलेल्या जवळपास 8 नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. सध्या इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. इमारतीच्या बाजूचा मलबा हटविण्यासाठी जेसीबी, पोकलेन आणि डंपरचा वापर केला जात आहे. इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या जीवाला कोणाताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी काळजीपूर्वक ही मोहीम हाताळली जात आहे. 

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे आणि एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती घेऊन पुढील बचावकार्याच्या रणनीतीवर चर्चा केली. अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे कसे बाहेर काढता येईल,यासाठी घटनास्थळाची आणि इमारतीची सद्यस्थिती याचा सर्व बाजूने विचार करून रणनीती ठरवण्यात आली आहे. 

Advertisement

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व यंत्रणांना दिले निर्देश

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बचावकार्यासाठी आवश्यक सर्व साधनसामग्री आणि मशिनरी उपलब्ध ठेऊन मशिनरी कार्यरत आहेत. या घटनेनंतर जवळपास 45 तासांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे जलद गतीने मोहीम राबवून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांना तसे निर्देश दिले आहेत, असं डॉ. सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Pandharpur News : वारकऱ्यांसाठी अलर्ट! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात महिला चोरांची टोळी सक्रिय, CCTV Video

इमारतीच्या समोरील बाजूने प्रवेश करण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून मागील बाजूने इमारतीत प्रवेश करण्यासाठी त्या ठिकाणचा मलबा हटवून सुरक्षित मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीत अडकलेल्या ज्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे त्यांच्याकडून माहिती घेऊन आत अडकलेले नागरिक नेमके कोणत्या जागी अडकले आहेत, त्या जागेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्ग तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार बचावकार्याला गती देण्यात आली आहे, अशी माहिती एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी दिली आहे. 

"आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवा"

दरम्यान, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनीही दुर्घटनास्थळी भेट देऊन बचाव मोहिमेचा आढावा घेतला. त्यांनी महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून दुर्घटना आणि सुरू असलेल्या बचावकार्याची सविस्तर माहिती घेतली. आत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवा असे ते म्हणाले. तसेच इमारतीत अडकलेल्या नातेवाईकांशी घटनास्थळी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे तसेच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

तसच महापौर रवि लांडगे यांनी दुर्घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. सध्या सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती देत, सर्व यंत्रणा समन्वयाने आणि अत्यंत दक्षतेने कार्यरत असून अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले.

Advertisement