जाहिरात

Pandharpur News : वारकऱ्यांसाठी अलर्ट! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात महिला चोरांची टोळी सक्रिय, CCTV Video

आषाढीच्या तोंडावर पंढरपुरात भाविकांची गर्दी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळी चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. महिला चोरांचा खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे.

Pandharpur News : वारकऱ्यांसाठी अलर्ट! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात महिला चोरांची टोळी सक्रिय, CCTV Video
Pandharpur Women Thieves CCTV Video

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

Women Thives Caught In CCTV Camera : आषाढीच्या तोंडावर पंढरपुरात भाविकांची गर्दी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळी चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. मंगळसूत्र व चैन चोरी करणाऱ्या महिलांची टोळीच पंढरपूरमध्ये दाखल झाले असून महिलांच्या गर्दीत घुसून मंगळसूत्र चोरी करण्याचे सत्र सुरू आहे. याच बाबत आज विठ्ठल मंदिर परिसरातील एका बांगड्याच्या दुकानात मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत उपस्थित महिलांनी मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिलांना धरून मोठा चोप दिला. यानंतर संबंधित चोरी करणाऱ्या संशयित महिलेस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

महिला चोरट्याला पकडून बेदम चोप दिला

याबाबत अधिक माहिती अशी की ,पंढरपुरात आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. यामध्ये महिला भाविकांचे प्रमाण देखील मोठे आहे. याच महिला भाविकांच्या गर्दीमध्ये शिरूर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र सोन्याची चैन सोन्याचे कानातले असे दागिने चोरण्याचे प्रमाण मोठे आहे. आजच पंढरपूरच्या व्हीआयपी गेट समोर एका बांगडीच्या दुकानात महिलांच्या गर्दीत घुसून मंगळसूत्र चोरण्याचा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली. त्यानंतर उपस्थित महिलांनी संबंधित महिला चोराला धरून बेदम चोप दिला आहे. यानंतर पोलिसांच्या ताब्यात महिला चोरास देण्यात आले. 

नक्की वाचा >> Pune News: विठ्ठल नामाच्या गजरात पालख्या पुण्यात दाखल, आयुक्तांच्या एका कृतीनं सर्व वारकरी झाले खुश, Video

वारकरी वेशातील पोलिसांच्या माऊली पथकाची नेमणूक

आषाढी वारी काळामध्ये मंगळसूत्र चोरी महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी अशा घटना वारंवार घडतात.यासाठीच नुकतेच सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी वारकरी वेशातील पोलिसांच्या माऊली पथकाची नेमणूक केली आहे. गतवर्षीपासून वारकरी वेशातील माऊली पथकातील पोलीस मंगळसूत्र चोरी व सोन्याची चैन चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेतात. गेल्यावर्षी देखील अशा अनेक चोरांना पोलिसांनी पकडले. मात्र यामध्ये यांना महिला चोरांचा समावेश असल्याचे पुढे येत असल्याने आता महिला पोलीस देखील माऊली पथकाच्या माध्यमातून मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेताना येत्या काळात दिसून येतील.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com