अंबरनाथमध्ये तुफान राडा! शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर, रहिवाशांकडून दगडफेक अन् रास्ता रोको, कारण काय?

अंबरनाथ पूर्वेतील पुरातन शिवमंदिर परिसरात काम केले जात आहे. या कामामुळे 32 नागरिकांची घरे तोडण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाईला स्थानिक रहिवाशांनी प्रचंड विरोध केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ambarnath Shiv Mandir Latest News

Ambarnath News Today : अंबरनाथ पूर्वेतील पुरातन शिवमंदिर परिसरात काम केले जात आहे. या कामामुळे 32 नागरिकांची घरे तोडण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाईला स्थानिक रहिवाशांनी प्रचंड विरोध केला आहे. या कारवाई दरम्यान दगडफेक करण्यात आली. रास्ता रोको करण्यात आला. विकासकामे करण्यापूर्वी आमचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी बाधित रहिवाशांनी केली आहे. या ठिकाणी सरकारकडून 550 कोटींचं कॉरीडोअर उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय.

विकासकामासाठी 32 घरांवर तोडू कारवाई केली जाईल. यासाठी संबंधित रहिवाशांना कारवाईपूर्वीच नोटिसा पाठविल्या होत्या. घरे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या कारवाईला रहिवासी प्रचंड विरोध करत आहे.आधी आमचे पुनर्वसन करा.त्यानंतर विकास कामे करा.आमचा विकासाला विरोध नाही. अशी भूमिका बाधित रहिवाशांनी घेतली आहे.प्रशासनाकडून बुलडोझर घेऊन तोडू कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान कारवाई पथकाला तीव्र विरोध करण्यात आला. रहिवाशांकडून दगडफेक करण्यात आली. रास्ता रोको करण्यात आला. पोलीस आणि रहिवासी यांच्यात जोरदार झटापट झाली. 

Advertisement

नक्की वाचा >> Akola News: क्लास न लावता UPSC क्रॅक केली, अकोल्याच्या 'या' तालुक्यातील लेक IAS बनली, काय होता स्टडी प्लॅन?

"आमच्यावर लाठीचार्ज केला आणि..."

याबाबत स्थानिक रहिवासी विशाल भारती यांनी सांगितले की,25 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून आम्ही या ठिकाणी राहतो.पोलिसांनी थेट कारवाई पथक आणले.घरातील सामान काढण्यासाठीही वेळ दिला नाही. आमच्यावर लाठी चार्ज केला.आमची डोकी फोडली.थेट आमच्या घरावर जेसीबी चालविला.आमची घरे उद्धवस्त केली आहे.घराच्या बदल्यात घर देणार असे आश्वासन दिले होते.त्याची  पूर्तता केली नाही. 

नक्की वाचा >> पतीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नीनं केलं भयंकर कृत्य, अख्ख कुटुंब हादरलं! वादाचं कारण वाचून धक्काच बसेल

रहिवासी शहानवाज शेख यांनी सांगितले की,आम्ही अनेक वर्षापासून याठिकाणी राहतो.खासदारांनी आम्हाला घरे देण्याचे आश्वासन दिले होते.ते पाळण्यात आलेले नाही.थेट आमच्या घरावर कारवाई केली. आत्ता आम्ही राहायचे कुठे असा सवाल उपस्थित केला. रुकसार शेख या महिलेने सांगितले की,"मी गर्भवती महिला आहे. पोलिसांनी थेट माझ्या डोक्यावर लाठी हाणली.मला जबर मार लागला आहे".