पुणे-सोलापूर महामार्गावर बस-ट्रकचा विचित्र अपघात, बस 25 फूट खोल खड्यात घसरली

Accident News : खाजगी बस सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधून पुण्याच्या दिशेने निघाली होती, अशी माहिती मिळत आहे. इंदापूरपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर एक मालवाहू ट्रक पुण्याच्या दिशेने निघाला होता.

Advertisement
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, इंदापूर

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर खाजगी प्रवाशी बसला अपघात झाला. पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती आणि इंदापूर बाह्यवळणापासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याची माहिती मिळत आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

टायर फुटल्याने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसने धडक दिली. त्यानंतर ही बस पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खड्ड्यात जाऊन आदळली. या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र या बसमधील 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी झाले असून या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस आणि NHAI चे पथक या ठिकाणी दाखल झाले.

(नक्की वाचा -  सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकारच्या निर्णयामुळे अधिकचा आर्थिक लाभ मिळणार)

खाजगी बस सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधून पुण्याच्या दिशेने निघाली होती, अशी माहिती मिळत आहे. इंदापूरपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर एक मालवाहू ट्रक पुण्याच्या दिशेने निघाला होता. अचानक बसचा टायर फुटल्याने या बसने ट्रकला धडक दिली. या अपघातात ट्रकमधील लोखंडी सामान देखील रस्त्यावर विखुरला गेलं. तर बस पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडून थेट 25 फूट रोडच्या बाहेर जाऊन आदळली.

(नक्की वाचा -  "बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे", अजित पवार असं का म्हणाले?)

सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचं आणि या खाजगी मालवाहू ट्रकचं मोठ्या नुकसान झालं आहे. तर 10 ते 11 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी महामार्गावरील अपघातग्रस्त ट्रक बाजूला करत वाहतूक सुरळीत केली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article