Navi Mumbai News : नवी मुंबईतील पाम बीच रोडवर भयंकर घटना, शहरातील नागरिकांसह प्रवाशांनी वेळीच सतर्क राहा

नवी मुंबईतील पाम बीच मार्गांवर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Navi Mumbai Accident News
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Latest News : नवी मुंबईतील पाम बीच मार्गांवर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.  या मार्गावर 60 किमी प्रतितास अशी अधिकृत वेगमर्यादा असतानाही अनेक वाहनचालक नियम धाब्यावर बसवून अतिवेगाने वाहन चालवतात. अशा बेजबाबदार चालकांमुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. 

आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास नेरूळ ते सानपाडा मोराज सिग्नल दरम्यान एक भीषण अपघात घडला. एका ऑटो रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात एका चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यालगत असलेल्या डिव्हायडरला जोरात धडकली. कार पलटी झाल्यानंतर कारमध्ये असलेला चालक आणि ऑटो चालक हे दोघेही गंभीर जखमी झाले. 

वाहनचालकांकडून स्टंटबाजी, रेसिंगसारखे प्रकार

या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.पाम बीच मार्गांवर विशेषतः रात्रीच्या वेळी वेगाचा कहर अधिकच वाढताना दिसत आहे.अनेक ठिकाणी भरधाव वाहनचालकांकडून स्टंटबाजी,अचानक लेन बदल,रेसिंग यासारखे प्रकार सर्रास घडत असून यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची मशाल पेटली, 'या' निकालाची राज्यभर चर्चा, गड आला पण सिंह गेला..

वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या मार्गांवर कडक वेगमर्यादाची अंमलबजावणी,स्पीड कॅमेरे,सीसीटीव्ही आणि रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.अन्यथा पाम बीच मार्गांवर वेगाचा हा कहर आणखी अनेक निष्पापांचे बळी घेणार,अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

Advertisement