महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. ईव्हीएमवर सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असा दावा देखील निवडणुकीदरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला होता. बशर सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ तयार केला होता. याबाबत आता महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बशर सय्यद शुजा याच्या विरोधात खोटे, निराधार दावे केल्या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. IPC च्या कलम 318(4) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 43(g) आणि 66D अंतर्गत शुजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
(नक्की वाचा: सरकार स्थापनेला उशीर, अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फटका)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यानही शुजाने एक व्हिडीओ रिलीज केला होता. शुजाने ईव्हीएम हॅक करण्याबाबतच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये दावा केला होता की ईव्हीएम हॅक करुन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात फेरफार करता येऊ शकते. यासाठी त्याने पैशांची देखील मागणी देखील केली होती.
2019 मध्येही केला होता दावा
शुजाने 21 जानेवारी 2019 रोजी लंडनमध्ये एका पत्रकार परिषदेत तोंडाला रूमाल बांधून ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते असा दावा केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हेराफेरी झाली होती असाही दावा त्याने केला होता. मात्र त्याने याबाबत त्याने कोणताही पुरावा दिला नव्हता. त्यावेळी त्याच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
(नक्की वाचा - Shrinkat Shinde : उपमुख्यमंत्रिपदाच्या चर्चेबाबत श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया)
निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
अशा कृती हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्यात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, असे एका वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याने TOI ला सांगितले. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिले की, "EVM हे स्टँडअलोन डिव्हाइस असल्याने कोणत्याही व्यक्तीद्वारे वायफाय किंवा ब्लूटूथसह कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट केले जाऊ शकत नाही. त्यामुळे ईव्हीएममध्ये फेरफार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ईव्हीएम पूर्णपणे छेडछाड प्रतिबंधक आहेत."