Mumbai Marathi Girl Viral News : मराठी माणसांना प्रवासादरम्यान किंवा एखाद्या कंपनीच्या कार्यालयात परप्रांतीय लोकांनी त्रास दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते त्यांना चांगलाच इंगा दाखवतात. मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून होणारे वादही मनसे स्टाईलने सोडवले जात असल्याचं पाहायला मिळतं.डोंबिवलीत शोर्माचा फूड स्टॉल चालवणाऱ्या एकता सावंतला मनसेनं नुकतंच न्याय दिल्याचं बोललं जातं.अशातच आता घाटकोपर येथील मराठी तरुणीलाही मनसेनं मदत केल्याचं समोर आलं आहे. अश्विनी घाडगे असं या मराठी मुलीचं नाव असून सेराब्रस कन्सल्टिंग कंपनीत तिच्यासोबत नेमकं काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार,घाटकोपरमधील सेराब्रस कन्सल्टिंग (Cerabrus Consulting) नावाच्या कंपनीकडून मराठी तरुणी अश्विनी घाडगेला 3 महिन्यांचा पगार देण्यात आला नव्हता.कंपनीचे लोक अश्विनीला त्रास द्यायचे. त्यानंतर तिने नोकरी सोडून दिल्यावर तिचा तीन महिन्यांचा पगार थकवण्यात आला.
नक्की वाचा >> Kalyan News : कल्याणच्या 'या' पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, संध्याकाळी 4 वाजता शुकशुकाट
तरुणीसह कुटुंबीयांनी राज ठाकरेंचे मानले आभार
कंपनीच्या मालकांनी पगार थकवल्याने मनसेनं ठिय्या आंदोलन केलं. वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कुटुंबीयांनी मनसेकडे धाव घेतली.मनसेच्या ठिय्या आंदोलनानंतर अश्विनीच्या खात्यात पगार जमा झाला.त्यानंतर अश्विनी आणि तिच्या कुटुंबीयांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.