Chandrapur Tadoba News: ताडोबातील या भागात 92 दिवस पर्यटकांना नो एण्ट्री, वन विभागाकडून मोठा अलर्ट जारी

Tadoba National Park Core Zone Closed: चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. नेमके काय आहे यामागील कारण?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Tadoba National Park Core Zone Closed: पर्यटकांसाठी मोठी बातमी"
प्रतिकात्मक फोटो (Canva)

Tadoba National Park Core Zone Closed: चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा (TATR) अंतर्गत भाग (कोअर झोन) 30 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. वन अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी मान्सूनच्या काळात लागू करण्यात येणारी ही बंदी वन्यजीव संरक्षण आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

मुख्य वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक पी. एन. शुक्ला यांनी मंगळवारी (2 जून) सांगितले की, या कालावधीत सर्व बफर (सुरक्षा) क्षेत्रांचे पर्यटन दरवाजे आणि बफर पर्यटन क्षेत्र पर्यटकांसाठी खुले राहतील. पण त्यांचे नियंत्रण आणि संचालन हवामानाची स्थिती तसेच वेळोवेळी जारी केल्या जाणाऱ्या प्रशासकीय सूचनांवर अवलंबून असेल.

Advertisement

92 दिवस पर्यटकांना नो एण्ट्री

पावसाळ्याच्या दिवसांत 30 जून ते 30 सप्टेंबर या तीन महिन्यांच्या काळात अभयारण्याचा कोअर झोन पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद असेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वन्यजीवांचे संवर्धन आणि पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

(नक्की वाचा : Tuljapur News: तुळजापुरात भक्तीच्या दारातच VIP भिंत; सर्वसामान्यांचा प्रवेश रोखल्याने संतापाचा उद्रेक)

वेबसाइट हॅक झाल्याचा दावा फेटाळला

याचसोबत पी. एन. शुक्ला यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची वेबसाइट हॅक झाल्याचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे असा दावा करण्यात आला होता की, कोणीतरी व्यक्ती बेकायदेशीरपणे ऑनलाइन तिकिटांचा 80 टक्के हिस्सा विकत आहे. या दाव्यावर बोलताना वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. संबंधित पोस्टचे स्वरूप बदनामीकारक असल्याने या प्रकरणी पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

(Content PTI)