Sambhajinagar Crime: "मी आता थकलोय...", सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; VIDEO शूट करत म्हटलं...

Chhatrapati Sambhajinagar Crime News: आत्महत्या करण्यापूर्वी शेख करीम यांनी आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सावकारी जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने स्वतःच्या आयुष्याचा अंत केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी तयार केलेला 42 सेकंदांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

वैजापूर शहरातील नामांकित बटाटा व्यापारी शेख करीम शेख चुन्नू यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. सावकारांनी लावलेला पैशांचा तगादा आणि त्यातून होणारा मानसिक छळ सहन न झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

(नक्की वाचा- Mumbai Mayor: ...तर ठाकरे गटाला लागणार महापौरपदाची 'लॉटरी'? कसं? वाचा सविस्तर)

'मी थकलोय...'

आत्महत्या करण्यापूर्वी शेख करीम यांनी आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं की, "ये विक्या, मुक्या बहुत परेशान कर रहे है मुझे. मै घरवालोंसे बहुत प्यार करता हू लेकीन मै थक गया हू. मैं खुदखुशी कर रहा हू.."  या व्हिडिओवरून शेख करीम हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होते, हे स्पष्टपणे जाणवते.

7 जणांवर गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. शेख करीम यांनी व्हिडिओमध्ये उल्लेख केलेली नावे आणि कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी *७ सावकारांविरुद्ध* आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर सावकारी आणि व्याजाच्या वसुलीसाठी दिला जाणारा त्रास या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले))

वैजापूर परिसरात मागील काही काळापासून बेकायदेशीर सावकारीचे जाळे पसरले असून, अनेक छोटे-मोठे व्यापारी यात अडकले जात असल्याची चर्चा आहे. शेख करीम यांच्या आत्महत्येमुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे.