Student died in Mumbra : घरातून मुलं शाळेसाठी निघाली मात्र प्रत्यक्षात शाळेत न जाता ती दुसऱ्याच ठिकाणी फिरायला गेली. यातून एका मुलाला जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. मुंब्रात डोंगराळ भागात फिरत असताना एका डॅममध्ये बुडाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
धक्कादायक (Mumbai News) बाब म्हणजे हा मुलगा बुडाल्यानंतर त्याच्या सोबत गेलेले मित्र तशीच घरी परतले. बराच वेळ झाला तरी मुलगा न आल्याने घरातल्यांनी शोधाशोध सुरू केली. शेवटी मित्रांची चौकशी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. हे सर्व मित्र शाळेत जाण्यासाठी निघाले, मात्र शाळेत न जाता ते मुंब्रातील डोंगराळ भागात फिरायला गेले होते. यावेळी डॅमजवळ अहद अन्सारी हा 14 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला. मिळालेल्या माहितीनुसार, धारावी परिसरात राहणारा अहमद हा मित्रांसोबत मुंब्रात डोंगराळ भागात फिरायला आला होता, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.
नक्की वाचा - Pune News : नवरा-बायकोच्या भांडणात 11 महिन्याच्या बाळाचा मृ्त्यू; पोलिसांना मात्र वेगळाच संशय
यानंतर पालकांनी मुंब्रा पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. हा परिसर नवी मुंबई पोलीस स्टेशन अंतर्गत असल्याने नवी मुंबई पोलिसांनी याचा शोध सुरू केला. शेवटी 11 जुलै रोजी संध्याकाळी अहद अन्सायरी याचा मृतदेह सापडला. न्यायालयीन कारवाईनंतर शवविच्छेदन झाल्यानंतर मुलाचे मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अशा घटनांमुळे पालकांनी आपली मुलं शाळेतच नक्कीच जातात का याकडे लक्ष देणं अधिक गरजेचे आहे. अशा घटनांमुळे आता पालकांनी किमान अधिक सहज राहणं गरजेचं आहेत.