सिडकोच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मोठी भेट, संजय शिरसाट यांची मोठी घोषणा

सिडकोच्या या निर्णयामुळे 50 मीटरच्या आतील घराची विक्री किंवा पुनर्विकास करताना कोणतेही ट्रान्सफर चार्जेस भरावे लागणार नाहीत. तसेच 100 मीटरच्या घरांसाठी नाममात्र चार्जेस भरावे लागणार आहेत, अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सिडकोचं घर घेणाऱ्या नागरिकांसाठी खूशखबर आहे. सिडकोच्या घरात राहणाऱ्या जवळपास 2 कोटी नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोच्या जागेवरील घरे लीज होल्डवरुन फ्री होल्ड करण्याचा निर्णय सिडको बोर्डाने घेतला आहे. अनेक वर्षांपासूनची ही मागणी सिडकोने मान्य केली आहे.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिडकोच्या या निर्णयामुळे 50 मीटरच्या आतील घराची विक्री किंवा पुनर्विकास करताना कोणतेही ट्रान्सफर चार्जेस भरावे लागणार नाहीत. तसेच 100 मीटरच्या घरांसाठी नाममात्र चार्जेस भरावे लागणार आहेत, अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली आहे. 

(नक्की वाचा- ....फक्त भाजपाचे सरकार, अमित शाहांच्या घोषणेला अजित पवारांचं उत्तर)

सिडकोच्या रहिवाशांची मागणी होती की आमची घरे लीड होल्डवरुन फ्री होल्ड करा. आमची घरे हक्काची कधी होणार, अशी विचारणा त्यांच्याकडून केली जात होती. त्यामुळे सिडकोची घरे फ्री होल्ड करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. हा निर्णय घेताना कोणतेही चार्जेस सिडकोच्या घरांना लागणार नाही. हे सर्व चार्जेस संपुष्टात आले आहेत. त्यामुळे सिडकोचं घर सर्वसामान्याच्या हक्काचं होईल, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : 'राज्यात 2029 मध्ये फक्त भाजपा सरकार', अमित शाहांची घोषणा, 2024 साठी दिला मंत्र )

सिडको महामंडळाच्या महसुलावर याचा काहीसा परिणाम होईल. ⁠मात्र महसुलसाठी इतर पर्याय निवडले जातील. ⁠दोन कोटी लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे. ⁠घर विकायचं असेल तर सिडकोची परवानगी गरज नाही. ⁠नवी मुंबई, संभाजीनगर, नाशिक आणि नागपूरला याचा फायदा होईल, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं. 

Advertisement