जाहिरात

'राज्यात 2029 मध्ये फक्त भाजपा सरकार', अमित शाहांची घोषणा, 2024 साठी दिला मंत्र

Amit Shah in Mumbai :  विधानसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी मुंबईत आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2029 मध्ये राज्यात भाजपाचं सरकार येईल, अशी घोषणा केली आहे.

'राज्यात 2029 मध्ये फक्त भाजपा सरकार', अमित शाहांची घोषणा, 2024 साठी दिला मंत्र
मुंबई:

Amit Shah in Mumbai :  विधानसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी मुंबईत आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2029 मध्ये राज्यात भाजपाचं सरकार येईल, अशी घोषणा केली आहे. 2029 साली राज्यात भाजपाचं शुद्ध सरकार येईल. तर यंदा महायुतीचं सरकार आणायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. भाजपा कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी या निवडणुकीतील पक्षाची रणनीती कशी असेल हे जाहीर केलं.

निराशा झटका

लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून आपले कार्यकर्ते निराश आहेत. गेल्या साठ वर्षात तीन वेळा नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन केलं आहे.  आपण निराश का असावं? लोकसभेत आपण सत्ताधारी बाकावर आहोत. लोकसभा निवडणूक आपणच जिंकलो. राहुलबाबा लोकसभा निवडणूक जिंकल्याचा दावा कसा करु शकतात? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आम्ही सरकारमधील दहा वर्षांच्या कालखंडात आमची विचारधारा सोडली नाही. राम मंदिराचे भूमिपूजन, निर्मिती आपण केली. कलम 370 हटवले.  राज्यात सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करणार असल्याची घोषणाही शाह यांनी केली. अनेक वर्ष पाकिस्तान बॉम्ब स्फोट करत होते. आपण त्यांच्या मुसक्या आवळल्या, असंही त्यांनी सांगितलं. 

2024 साठी दिला मंत्र 

भाजपा कार्यकर्त्यांमधील अंतर्गत मतभेदावरही अमित शाह यांनी यावेळी वक्तव्य केलं. घराघरात वाद असतात. तसंट विधानसभेतही आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांमधील मतभेद दूर करा. काम करताना वाद होतोच, पण तो वाद संपवता आला पाहिजे. काही कामं कुणालाच करायची नसतात. पण, खरा कार्यकर्ता तेच काम करायला घेतो. परिवारात वाद असले तरी तो एकच असतो, असं शाह यांनी महायुतीच्या मित्रपक्षांबाबत कार्यकर्त्यांना सांगितलं. 

( नक्की वाचा : महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत? )
 

आगामी विाधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार पुन्हा आणायचं आहे. त्यासाठी कामाला लागा. जे आपल्याला मतदान करत नाहीत. आपल्या विचाराचे नाहीत, अशा किमान 20 जणांना पक्षाचे सदस्य बनवा, अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांनी दिली. आपल्या मतदानाचा टक्का वाढवा, असं आवाहन त्यांनी केलं.

लोकसभा निवणुकीत अनेक मतदारसंघात सहापैकी एका ठिकाणी आपण पिछाडीवर होतो. पाच मतदारसंघात आघाडीवर होतो. त्यामुळे आपण निवडणूक हरलेलो नाहीत, हे समजून घ्या, असंही शाह यांनी यावेळी सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
त्यांना राजे म्हणण्याची लाज वाटते! लक्ष्मण हाकेंचा संभाजीराजेंवर खळबळजनक आरोप
'राज्यात 2029 मध्ये फक्त भाजपा सरकार', अमित शाहांची घोषणा, 2024 साठी दिला मंत्र
ajit-pawar-replies-amit-shah-bjp-2029-government-announcment
Next Article
....फक्त भाजपाचे सरकार, अमित शाहांच्या घोषणेला अजित पवारांचं उत्तर