सिडकोने आपल्या नव्या लॉटरीची घोषणा केली आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 रोजी एकूण 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. ही घरे मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यात नवी मुंबईतील कळंबोली, खारघर व घणसोली भागात ही घरे आहेत. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 38 व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 175 याप्रमाणे एकूण 213 घरं, तसेच सिडकोच्या खारघर येथील स्वप्नपूर्ती व वास्तूविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील मिळून एकूण 689 सदनिकांच्या विक्रीकरिता ही योजना आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिडकोने अनेक फ्लॅट आता पर्यंत दिले आहेत. त्यामुळे नव्या लॉटरीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शिवाय सिडकोचीच घरे का खरेदी कराल याचे कारणही सिडकोने सांगितले आहे. नव्या लॉटरीमधील सर्वच घरं ही मोक्याच्या ठिकाणी आहेत. शिवाय दर्जेदार काम हे सिडकोच्या घरांचे वैशिष्ट्य आहे असेही सोडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे यांनी सांगितलं. ही घरं प्रतिष्ठीत आणि मोठ्या विकासकांनी बांधली आहे. शिवाय या घरांच्या किंमतही कमी आहेत. बाजार भावा पेक्षा ही घरं स्वस्त आहेत. सिडको जमिनीची किंमत घेत नाही. त्यामुळे ही घरे स्वस्तात मिळतात. रिजनेबल आणि हाय कॉलिटीची घरं असल्याचा दावा रतांबे यांनी केला आहे. त्यामुळे सिडकोचीच घरे खरेदी करावीत असं त्या म्हणाल्या.
ट्रेंडिंग बातमी - गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर CIDCO Lottery चा शुभारंभ; कुठे आणि किती घरे असणार?
सिडकोच्या लॉटरी आधी म्हाडाची लॉटरी जाहीर झाली होती. त्यावेळी बोगस साईड तयार करण्यात आली होती. त्यावरून अनेक लोकांची फसवणूकही झाली. अशी वेळी सिडकोने मोठं आवाहन केले आहे. कोणत्या ही भुलथापांना बळी पडू नका. सिडकोने कोणतेही एजंट नेमलेले नाहीत. काही अडचणी असतील तर त्या थेट सिडकोच्या पणन विभागाला विचारा. सिडकोच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जाणार आहेत. ते तुम्ही घर बसल्या भरू शकता. ही सर्व प्रक्रिया पारदर्शी असेल असंही त्यांनी सांगितले. सिडकोच्या सर्व साईड्स या अपडेट आहेत. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांची सुरक्षा वाढवली; केंद्राकडून मिळाली झेड प्लस सुरक्षा, पण कारण काय?
सिडकोतर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरता गृहनिर्माण योजना राबवण्यात येतात. या वर्षीच्या कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनेद्वारे नागरिकांना सर्व पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता 38 व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 175 याप्रमाणे एकूण 213 सदनिका तसेच सिडकोच्या खारघर येथील स्वप्नपूर्ती व वास्तूविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील मिळून एकूण 689 सदनिकांच्या विक्रीकरिता गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये वन आणि टू बीएचके घरे असणार आहेत.