जाहिरात

गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर CIDCO Lottery चा शुभारंभ; कुठे आणि किती घरे असणार?

CIDCO lottery 2024 : सिडको गृहनिर्माण योजनेद्वारे नागरिकांना सर्व पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे. 

गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर CIDCO Lottery चा शुभारंभ; कुठे आणि किती घरे असणार?

सिडको महामंडळातर्फे कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 रोजी एकूण 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या गृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील कळंबोली, खारघर व घणसोली या विकसित नोडमध्ये सदनिका असणार आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता 38 व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 175 याप्रमाणे एकूण 213 सदनिका तसेच सिडकोच्या खारघर येथील स्वप्नपूर्ती व वास्तूविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील मिळून एकूण 689 सदनिकांच्या विक्रीकरिता गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात येणार आहे. 

( नक्की वाचा : ती 42 वर्ष जिवंत प्रेत म्हणून जगत होती....अरुणा शानबाग केस काय आहे? सध्या का होतीय चर्चा? )

सिडकोतर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजना राबवण्यात येतात. या वर्षीच्या कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनेद्वारे नागरिकांना सर्व पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे. 

( नक्की वाचा : ती 42 वर्ष जिवंत प्रेत म्हणून जगत होती....अरुणा शानबाग केस काय आहे? सध्या का होतीय चर्चा? )

या गृहसंकुलांना रेल्वे, रस्ते, मेट्रो द्वारे कनेक्टिव्हिटी लाभली आहे. सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह सिडकोचे अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्प या गृहसंकुलांपासून नजीकच्या अंतरावर आहेत. यामुळे नागरिकांना परिपूर्ण जीवनशैली अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com