हवामान बदलामुळे डासांची शक्ती चारपट वाढली; संशोधनातून अनेक धोके आले समोर

जगभरात दरवर्षी 70 कोटी लोकांना डासांमुळे आजार होतात. यापैकी, 10 लाख लोक मृत्यूमुखी पडतात. डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू या आजारामुळे दरवर्षी 30.90 कोटी लोक प्रभावित होत असतात.

Advertisement
Read Time: 2 mins

संजय तिवारी, नागपूर

जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या हवामान बदलाचा आणखी एक दुष्प्रभाव संशोधनातून समोर आला आहे. हवामान बदलामुळे डेंग्यु, चिकनगुनिया, हिवतापासारखे आजार पसरवणाऱ्या डासांची शक्ती चारपट वाढली आहे. डासांची नुसती शक्ती वाढली असे नाही तर डासांची प्रजनन क्षमताही वाढली  आहे. चेन्नई येथील आरोग्य सल्लागार डॉ. जयालक्ष्मी श्रीधर यांनी याबाबत माहिती दिली आहे. नागपूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या अर्थ जर्नलिझम नेटवर्कच्या कार्यशाळेत डॉ. जयालक्ष्मी श्रीधर सहभागी झाल्या होत्या. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हवामान बदलाचा परिणाम डासांची भौगोलिक व्यापकता वाढण्यात झाला आहे. काही दशकांपूर्वी डासांचे प्रमाण जिथे कमी होते किंवा जवळपास नव्हते, त्याठिकाणी सुद्धा डासांच्या उत्पत्तीत वाढ झाल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या विषाणूंचा प्रादूर्भाव भारतातच नाही तर जगभरात वाढला आहे, त्यामागे हे कारण असल्याचे डॉ. जयालक्ष्मी श्रीधर यांनी सांगितले आहे. 

(नक्की वाचा-  सासरा आणि दिरासह तिघांकडून महिलेवर अत्याचार, टिटवाळा परिसरातील धक्कादायक घटना)

जगभरात दरवर्षी 70 कोटी लोकांना डासांमुळे आजार होतात. यापैकी, 10 लाख लोक मृत्यूमुखी पडतात. डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू या आजारामुळे दरवर्षी 30.90 कोटी लोक प्रभावित होत असून यापैकी एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे होणारा डेंग्यूचा प्रसार 28.6 टक्के आणि एई अल्बोपिक्टसमुळे होणारा डेंग्यूचा प्रसार 27.7 टक्क्यांनी वाढला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

(नक्की वाचा -  रात्रीच्या जेवणातील या चुका ठरू शकतात तुमचं वजन वाढण्याचं कारणं...)

हवामान बदलाचे अन्य परिणाम 

हवामान बदलामुळे जागतिक तापमानवाढ झाली असून त्याचे कित्येक परिणाम पुढे आले आहेत. तापमानवाढीमुळे दरवर्षी 6.67 लाख मृत्यू होतात, असे डॉ. जयालक्ष्मी श्रीधर यांनी सांगितले. मधुमेहाचे प्रमाण वाढणे, कमी वयात अवयव काम निष्क्रीय होणे. याशिवाय, महिला व पुरुषांमध्ये व्यंध्यत्त्वाचा धोका वाढला आहे.  वायुप्रदूषण, हवामान बदल यामुळे हृदय, किडनी, यकृताचे आजार झपाट्याने वाढत आहेत,  अशी त्यांनी डॉ. जयालक्ष्मी यांनी दिली.

Advertisement
Topics mentioned in this article