अमजद खान, कल्याण
सासरा , दिर आणि एका अल्पवयीन नातेवाईकाने महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आहे. कल्याणजवळील टिटवाळा परिसर या घटनेने हादरला आहे. घरात कुणी नसताना हा सगळा प्रकार घडला आहे. पीडित महिलेने जेव्हा आपल्यासोबत घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यावेळी तिच्या पतीने तिच्यावरच संशय घेत तिला बेदम मारहाण केली. महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर अखेर टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सासरा आणि दिराला अटक केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाही. डोंबिवलीत एका सावत्र बापाने आपल्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी सावत्र बापाला अटक केली होती. आता कल्याणनजीक टिटवाळामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या घटनेत नातेवाईकांनीच घरातील महिलेवर अतिप्रसंग केल्याची माहिती समोर आली आहे.
(नक्की वाचा- कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड? ऐन गणपतीत नदी काठी आढळले तिघांचे मृतदेह)
टिटवाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिटवाळा परिसरात राहणाऱ्या एका महिलेवर घरात सासरा आणि दिरासह एका अल्पवयीन नातेवाईकाने सामूहिक बलात्कार केला. महिलेने ही बाब कामावरून आलेल्या आपल्या पतीला सांगितली. पतीने पत्नीचे काही न ऐकता तिच्यावरच संशय घेतला. या कारणावरून पतीने महिलेला बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली.
(नक्की वाचा- गरिबीचा सौदा! बायको अन् नवजात बाळाला सोडवण्यासाठी त्यानं 2 वर्षांचा मुलाला विकलं )
जखमी महिलेला परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर जवळपास दोन दिवस उपचार करण्यात आले.अखेर या प्रकरणात महिलेने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर सासरा आणि दिराला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world