सागर कुलकर्णी, मुंबई
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. सत्तेचा माज करत धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये अनेर गैरकत्य केली. याचा फटका धनंजय मुंडे यांना बसला आहे. मात्र यातून धडा घेत मंत्र्यांना चुकीचं वर्तन न करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चुकीचं वर्तन आणि काम केलं तर परिणाम भोगावे लागतील असा दमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या सर्व मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी सागर निवासस्थानी बैठक घेतली होती.
(नक्की वाचा- राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? काँग्रेसचा बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार)
देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सर्व मंत्र्यांना दम भरला आहे. त्याचवेळी मंत्र्यांना सार्वजनिक वर्तनाचे बोल देखील सुनावले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या दिवशीच भाजपच्या मंत्र्यांची ही बैठक झाली. त्याच दिवशी या सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दर भरला.
(नक्की वाचा- राजीनामा देण्यास नकार, मुख्यमंत्र्यांची ताकीद; पडद्यामागे घडल्या नाट्यमय घडामोडी)
"तुम्ही मंत्री आहात, त्यामुळे जनतेला आणि आमदारांना सन्मानाने वागवा. लोकांशी बोलताना भाषा आणि वर्तणूक चांगली ठेवा. मोबाईलवर बोलताना तारतम्य ठेवा. चुकीचे वर्तन केल्यास मंत्रिपदावर गंभीर परिणाम होतील. लोकहिताची कामे आणि चांगल्या योजना शासनासाठी सूचवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना केल्या आहेत.