राज ठाकरे CM एकनाथ शिंदेंच्या भेटीला, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काय चर्चा झाली असावी, याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

विशाल पाटील, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन नेत्यांमध्ये झालेल्या भेटीची कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांचा पक्ष मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन नेत्यांच्या भेटीत नेमकी राजकीय चर्चा काय झाली असावी याबाबत मोठी उत्सुकता आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काय चर्चा झाली असावी, याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.

(नक्की वाचा - 'मिरज पॅटर्न'ने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली? महायुतीला होणार फायदा )

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री भेटीत काय संभाव्य चर्चा झाली? 

  1. एकीकडे विधानसभा निहाय मनसेच्या निरीक्षकांची बैठक सुरू आहे. ज्यात किती जागांवर मनसेचं पारडं जड आहे या संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे किती जागा मनसे उत्तम प्रकारे लढू शकते? याची चाचपणी केली जात आहे. 
  2. राज ठाकरे-महायुती  लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र होते. त्यामुळे विधानसभेसाठी मनसे एकत्र आल्यास किती जागा महायुती सोडू शकते? याबाबत चर्चा होऊ शकते. 
  3. दादर, माहीम हा शिवसेनेचा पारंपरिक गड जिथे आता सदा सरवणकर शिवसेनेचे आमदार आहेत. एकीकडे सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक न्यासच्या अध्यक्षपद दिले असताना ही जागा मनसेसाठी सोडण्याची शक्यता आहे का? 
  4. अमित ठाकरे यांनी विधानसभा लढवावी अशी आग्रहाची मागणी कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे जर अमित ठाकरे निवडणूक लढवतील तर त्यांना पाठिंबा असेल का? 
  5. राज ठाकरे यांच्यावरील येक नंबर या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चिंग बुधवारी करण्यात येणार आहे. यासाठीच आमंत्रण या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी दिलं असण्याची शक्यता आहे. 
     

Topics mentioned in this article