जाहिरात

बाबा सिद्दिकींवर गोळीबार करणारे 2 आरोपी अटकेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची माहिती

Baba Siddique News : तिन्ही आरोपींवर कठोर कारवाई होईल. प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यासाठी न्यायलयाला विनंदी करु. गुन्हेगारांवर जबर बसेल अशी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.  

बाबा सिद्दिकींवर गोळीबार करणारे 2 आरोपी अटकेत;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची माहिती

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईच्या वांद्र्यातील खेरवाडी परिसरार हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर 3 अज्ञात हल्लेखोरांनी रात्री 9 वाजेच्या सुमारास गोळीबार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माध्यमांसमोर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत म्हटलं की, बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  गोळीबाराच्या घटनेनंतर बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी मी डॉक्टर आणि मुबंई पोलीस आयुक्तांकडून माहिती घेतली आहे. 

याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एक आरोपी हरियाणा आणि एक आरोपी उत्तर प्रदेशाचा आहे. तर एक आरोपी फरार आहे. पोलिसांना निर्देश दिले आहेत की, मुंबईत कायदा सुव्यवस्था कुणीही हातात घेता कामा नये. गँगवार डोकं वर काढता कामा नये. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

(नक्की वाचा-  Big Breaking News : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या, SRA च्या वादातून गोळीबार)

तिन्ही आरोपींवर कठोर कारवाई होईल. प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यासाठी न्यायलयाला विनंदी करु. गुन्हेगारांवर जबर बसेल अशी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.  

फटाक्यांच्या आवाजात गोळाबार

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी गोळीबार झाला, तिथे फटाके वाजत होते. फटाक्यांच्या आवाजामुळे बाबा सिद्दीकी यांना गोळी लागल्याचं इतरांना कळालंच नाही. घटनेची माहिती मिळताच बाबा सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. गोळी शरीरातच अडकली होती. त्यामुळे रुग्णालयाचा नेण्यापूर्वीच त्यांचा मृ्त्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

( नक्की वाचा-  Uddhav Thackeray : 'शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्र मोदी-शाहांचा होवू देणार नाही'; दसरा मेळाव्यात ठाकरेंची शपथ)

15 दिवसांपूर्वीच मिळाली होती जीवे मारण्याची धमकी

बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र तरी देखील बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे पोलिसांचा वचक राहिला की नाही असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Big Breaking News : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या, SRA च्या वादातून गोळीबार?
बाबा सिद्दिकींवर गोळीबार करणारे 2 आरोपी अटकेत;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची माहिती
top 10 things in mumbai police investigation of Baba Siddiqui's murder case
Next Article
Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या तपासात काय-काय आलं समोर? 10 ठळक मुद्दे