माजी आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui Murder case) यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडाचा मुख्य आरोपी शिवकुमार याला उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई क्राइम ब्रँचच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. रविवारी उत्तर प्रदेशातील नानपारा येथून त्याला अटक करण्यात आली आहे. एसटीएफचे प्रमुख परमेश कुमार शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरीक्षक जावेद आलम सिद्दिकी यांनी ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवकुमार पळून जाण्याच्या तयारी होता. त्याआधी सापळा टाकून त्याला अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अनुराग कश्यप, ज्ञान प्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेषेंद्र प्रताप सिंह यांना देखील अटक केली.
नक्की वाचा - बाबा सिद्दीकी हत्याकांडाचं नक्षल कनेक्शन आलं समोर, प्लान B काय होता?
बाबा सिद्दीकी हत्याकांडात शिवकुमार हा मुख्य शूटर होता. पोलिसांच्या चौकशीत त्याने मोठे खुलासे केले आहेत. तो लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे. विदेशात असलेला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोर बिश्नोईच्या सांगण्यावरून आपण ही हत्या केल्याचे शिवकुमार याने चौकशीत सांगितले.शुभम लोनकरने अनमोल बिश्नोईसोबत त्याचे बोलणं करून दिलं होतं. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शिवकुमार उर्फ शिवा गौतम याने इस्टाग्रामवर एक रिल शेअर केले होते. केजीएफ चित्रपटातील डायलॉगचा हा व्हिडिओ आहे.
शिवकुमार याची अटक बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठं यश मानलं जात आहे. त्याच्या चौकशीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचं नेमकं कारण काय होतं, याचाही शोध घेतला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world