Kalyan Viral Video : कल्याण पश्चिमेतील पत्रीपूल परिसरातील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये विषारी नाग आढळल्याने काही काळ रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. इमारतीच्या विंगमधील जिन्याजवळ नाग जातीचा विषारी साप दिसताच रहिवाशांची एकच धावपळ उडाली.घटनेची माहिती मिळताच इमारतीतील एका रहिवाशाने तातडीने सर्पमित्र संदीप पंडित यांच्याशी संपर्क साधला.घटनास्थळी पोहोचलेल्या संदीप पंडित यांनी अत्यंत सावधगिरीने आणि सुरक्षित पद्धतीने नागाचे रेस्क्यू केले.त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
"नागरिकांनी सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा"
रेस्क्यू केल्यानंतर सापाला कोणतीही इजा न होता वनक्षेत्रात सुरक्षितपणे सोडण्यात आले.सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, पावसाळ्यात साप बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे मानवी वस्तीकडे वळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी साप आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन सर्पमित्र संदीप पंडित यांनी केले आहे.
नक्की वाचा >> Maharashtra Rain : महाराष्ट्रात 'या' तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस, जूनमध्ये पाऊस पडला कमी, कारण आलं समोर
इथे पाहा नाग सापाचा खतरनाक व्हिडीओ
— Naresh Shende (@NareshShen87640) June 26, 2026
कल्याणमध्ये नाग आढळून आल्याची ही सातवी घटना आहे कल्याण पश्चिम येथील गांधारी परिसरात अनेकदा नाग आढळून आले आहेत. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे परिसरात एका घरात मोठ्या प्रमाणात नागाचे पिल्लू आढळून आले होते.कल्याण नजीक वन क्षेत्रात लोक वस्ती वाढल्याने आणि उष्णतेमुळे साप नाग या रस्त्यावर लोकांच्या घरात शिरताय असा प्राथमिक अंदाज प्राणिमित्र आणि सर्व मित्रांनी वर्तवला आहे.
नक्की वाचा >> Dharashiv News : एका व्हिडीओमुळं भाविकांमध्ये घबराट, तुळजाभवानी मंदिरातीत 'त्या' घटनेची राज्यभर चर्चा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world