Maharashtra Rain Update : राज्यात काही भागात 23 जूनपासून मान्सूनच्या सरी कोसळल्या.अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचं आगमन उशिरा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चितेंच वातावरण आहे. धरणांमध्ये पाण्याचा तुरळक साठा शिल्लक असल्याने काही ठिकाणी पाणी टंचाईच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत.प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मान्सूनने गेल्या दोन दिवसांपासून काहीसा दिलासा दिला आहे. अशातच हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे.राज्यात 2 जुलैपासून मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवली, कारण..
अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. आतापर्यंत विदर्भात पाऊस कमी पडण्याचं प्रमाण 50 ते 60 टक्क्यांवर पोहोचल्याचं प्रादेशिक हवामान विभागाने एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे. अल निनोमुळे जून महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण घटले आहे. जूनमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडला आहे.
नक्की वाचा >> Dombivli News: डोंबिवलीतील 'ते' रुग्णालय मनसेच्या रडारवर, साप चावलेल्या रुग्णाने केला पर्दाफाश, काय घडलंय?
दरम्यान, राज्यात 2 जुलैपासून धो धो पाऊस बरसणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.या दिवसापासून राज्यभरात नियमित आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. जूनमध्ये राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणे अपेक्षित असते. परंतु,'अल निनो'चा प्रभाव असल्याने राज्यातल्या अनेक भागात पाऊस कमी झालास, अशी माहिती प्रादेशिक हवामान खात्याच्या रिसर्चमध्ये समोर आली आहे.राज्यात 2 जुलैपासून मुसळधार पाऊस सर्वदूर नियमित होईल. असेही प्रादेशिक हवामान खात्याचे म्हणणे आहे.
नक्की वाचा >> Crime News : भाऊ बनला 'कसाई', कैचीने कापले बहिणीच्या मृतदेहाचे तुकडे, टॉयलेटमध्ये केलं भयंकर कृत्य
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world