केंद्रीय अर्थसंकल्प आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत मांडला जाणार आहे. त्याआधी सर्वसामान्यांना मोठी खूशखबर मिळाली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्यावसायिक सिलेंडरची किंमत 7 रुपयांनी कमी झाली आहे. नवीन दर आज, शनिवार 1 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. 14 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
(नक्की वाचा- Economic Survey Report : आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे काय ? जाणून घ्या सर्वकाही)
नव्या दरांनुसार आजपासून मुंबईत 19 किलोचा सिलेंडर कपातीनंतर 1749.5 रुपयांना मिळणार आहे. गेल्या महिन्यात हा भाव 1756 रुपये होता. दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर आता 7 रुपयांच्या कपातीनंतर 1797 रुपयांना मिळणार आहे. गेल्या महिन्यात त्याची किंमत प्रति सिलेंडर 1804 रुपये होती.
(नक्की वाचा : Income Taxचे ओझे कमी करा, Mutual Fundवरील करांना कात्री लावा; अर्थमंत्र्यांना विनंती)
सलग दुसऱ्या महिन्यात कपात
गेल्या महिन्यातही व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. सर्वात मोठी तेल विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने जानेवारी 2025 मध्ये 6 महिन्यांत पहिल्यांदा 19 किलो सिलेंडरची किंमत 14.5 रुपयांनी कमी केली होती. मेट्रो शहरांमध्ये 16 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली असून यावेळी ही कपात 4 रुपयांपासून ते 7 रुपयांपर्यंत आहे.