यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Congress Leader Anantrao Thopate Condolence : काँग्रेसचे नेते स्वर्गीय अनंतराव थोपटे यांच्या सर्वपक्षीय शोकसभेमुळे शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शोकसभेचा कार्यक्रम अपेक्षेपेक्षा अधिक काळ चालल्याने नाटकाच्या प्रयोगासाठी आलेल्या प्रेक्षकांची मोठी गैरसोय झाली.यामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी शोकसभेला उपस्थित असलेल्या नागरिकांकडे नाराजी व्यक्त करत शाब्दिक वाद घातल्याची घटना घडली.
नाट्यप्रयोग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक जमा झाले अन्..
बालगंधर्व रंगमंदिरात नियोजित नाट्यप्रयोग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक दाखल झाले होते.मात्र त्याचवेळी स्वर्गीय अनंतराव थोपटे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली सर्वपक्षीय शोकसभा सुरू होती.अनेक राजकीय नेते,कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित असल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती.शोकसभेतील मान्यवरांची भाषणे आणि श्रद्धांजली कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ चालल्याने नाटकासाठी आलेल्या प्रेक्षकांना प्रवेश आणि हालचालींमध्ये अडचणी निर्माण झाल्या.
नक्की वाचा >> Jalgaon News: शिवसेना UBT नगराध्यक्षांची भाजप कार्यालयाला भेट, 'या' मंत्र्यासोबत बंद दाराआड केली एक तास चर्चा
शरद पवार यांच्या भाषणानंतर श्रद्धांजली अर्पण
यामुळे काही प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली.शोकसभेला आलेल्या काही नागरिकांशी त्यांची शाब्दिक चकमक झाली.त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.मात्र उपस्थित पोलिस आणि आयोजकांनी परिस्थिती हाताळत वाद वाढू दिला नाही.दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणानंतर स्वर्गीय अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि शोकसभेची सांगता झाली.त्यानंतर गर्दी कमी झाल्याने परिस्थिती सुरळीत झाली.मात्र नियोजनाच्या अभावामुळे नाट्यरसिकांची गैरसोय झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
नक्की वाचा >> Kalyan News: टिटवाळ्यात घबराट,12 गुंडांचा 'त्या' चाळीवर सशस्त्र हल्ला, महिलांचे कपडे फाडून अत्याचाराचा प्रयत्न
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world