Mumbai News : मुंबई-एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर किंवा त्यातून होणारं प्रदूषण जीवघेणे ठरू शकते. कर्करोग होईल असे धोकादायक प्रदूषक मोठ्या प्रमाणात येथे आढळले आहेत. भारतीय प्रौद्योगिकी संस्था मुंबई (IIT-B) च्या एका अभ्यासात ही गंभीर बाब समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेचरच्या ‘क्लीन एअर' जर्नलच्या या महिन्यात प्रकाशित झालेल्या संशोधनात कठोर उत्सर्जन नियंत्रण आणि स्वच्छ इंधनांकडे जलद गतीने वळण्याची तातडीची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
कामशेत बोगद्यात केलेल्या अभ्यासात पॉलीसायक्लिक एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) मोजले गेले. इंधन जळताना बाहेर पडणारे हे धोकादायक संयुगे आहेत. जे कर्करोगासह गंभीर आरोग्य समस्यांशी संबंधित आहेत. ही संयुगे प्रामुख्याने डिझेल वाहनांशी संबंधित आहेत.
(नक्की वाचा- Mumbai News : बायकोपासून बँकॉक ट्रिप लपवण्यासाठी नवऱ्याची भलतीच डेअरिंग; मुंबई एअरपोर्टवर अटक)
IIT-B च्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापक हरीश सी फुलरिया याबाबत म्हणाले की, यात सर्व प्रकारच्या डिझेल वाहनांची संख्या सर्वाधिक होती. पेट्रोल वाहनांची संख्या 41 टक्के होती, तर CNG वाहनांची संख्या केवळ 8 टक्के होती. नीट देखभाल न केलेली आणि जास्त भार असलेली अवजड डिझेल वाहनांचा यात सर्वाधिक समावेश होता.
जवळजवळ 99 टक्के कर्करोगाचा धोका केवळ सात विशिष्ट PAHs मुळे होता. ज्यांना WHO च्या कर्करोग संशोधन संस्थेने कर्करोगजनक म्हणून वर्गीकृत केले आहे. ही हानिकारक संयुगे बोगद्याच्या ठिकाणी हवेच्या नमुन्यांमध्ये आढळली, असेही त्यांनी सांगितले.
कामशेत बोगद्यातून दररोज लाखो वाहने धावतात. येथील हवेत अत्यंत सूक्ष्म, पण घातक PAHs रसायनं मिसळतात. आयआयटी बॉम्बेच्या संशोधनातून समोर आलंय की, कामशेत बोगद्यात हवेत आढळणाऱ्या PAHs – पॉलीसायक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स – या संयुगांची मात्रा ही राष्ट्रीय मर्यादेपेक्षा तब्बल 13 पट अधिक आहे. IIT च्या अभ्यासानुसार, दर दशलक्षात 5 प्रौढांना आणि 2 मुलांना यामुळे कर्करोगाचा धोका आहे.
(नक्की वाचा- Water Crises : राज्यात पाणीटंचाई वाढली; 16 जिल्ह्यांत अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा)
या प्रदूषकांमुळे केवळ फुफ्फुसांचेच नव्हे, तर शरीरातील विविध अवयवांचं नुकसान होऊ शकतं. या अभ्यासानुसार फक्त सात PAHs संयुगं मिळूनच एकूण 99 'टक्के कर्करोगाचा धोका निर्माण करत आहेत.
आरोग्याच्या धोक्यांव्यतिरिक्त, संशोधकांना असे आढळले की यातून होणाऱ्या उत्सर्जनाचा हवामान बदलावरचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढतो. IIT-B मधील संशोधकांनी IIT पाटण्याचे प्राध्यापक प्रधी राजीव आणि IIT कानपूरचे प्राध्यापक तरुण गुप्ता यांच्या सहकार्याने या अभ्यासाचे नेतृत्व केले.