जाहिरात

Neet Exam Result : नीट फेरपरीक्षेचा पुण्यातील विद्यार्थ्याला फटका, रँकमध्ये मोठी घसरण, पालक कोर्टात जाणार

नीट परीक्षेच्या निकालासंदर्भात आणखी एक वाद समोर आला आहे.पुण्यातील नरेंद्र चव्हाण या विद्यार्थ्याच्या रँकमध्ये फेरपरीक्षेनंतर झालेल्या मोठ्या घसरणीवर त्याच्या पालकांनी गंभीर आक्षेप घेतला आहे.

Neet Exam Result : नीट फेरपरीक्षेचा पुण्यातील विद्यार्थ्याला फटका, रँकमध्ये मोठी घसरण, पालक कोर्टात जाणार
Neet Re Exam Result Controversy
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

NEET Result Controversy : नीट परीक्षेच्या निकालासंदर्भात आणखी एक वाद समोर आला आहे.पुण्यातील आर्यन ब्रम्हदास चव्हाण या विद्यार्थ्याच्या रँकमध्ये फेरपरीक्षेनंतर झालेल्या मोठ्या घसरणीवर त्याच्या पालकांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार,नीटच्या मूळ परीक्षेत नरेंद्र चव्हाण याने देशात आठवा क्रमांक मिळविला होता.

विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात

मात्र, फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याची रँक थेट 10 लाखांच्या पुढे गेली. इतका मोठा फरक कसा पडला,याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.निकालातील या तफावतीमुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याचा दावा पालकांनी केला आहे. फेरपरीक्षेची प्रक्रिया, गुणांकन पद्धती आणि निकालातील पारदर्शकतेबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली आहे. 

नक्की वाचा >> Pune News : पुण्यातील 'या' नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचे कार्यालय सील, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांकडून संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि विद्यार्थ्याला न्याय मिळावा,या मागणीसाठी नरेंद्र चव्हाणचे आई-वडील मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान,या प्रकरणाबाबत संबंधित परीक्षा प्राधिकरणाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.तसेच पालकांनी केलेल्या दाव्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com