Nagpur News: लग्नाच्या वाढदिवशीत दाम्पत्याने संपवलं जीवन, सुसाईड नोट वाचून सर्वच सून्न झाले

Nagpur News: मॉनक्रिप दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवून व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

बेरोजगारी तसेच अपत्य होत नसल्याने नैराश्येत असलेल्या दाम्पत्याने मृत्यूला कवटाळलं आहे. नागपूरमधील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टीनगर परिसरात ही घटना घडली आहे. दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट, स्टॅम्प पेपर आणि इंस्टाग्राम व्हिडीयो देखील केला. याशिवाय अंत्यसंस्कारासाठी 75 हजार रुपये वेगळे ठेवल्याचा उल्लेख केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप आणि पत्नी ॲनी जारील मॉनक्रिप अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. लग्नाच्या वाढदिवशीच मॉनक्रिप दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे कपडे परिधान करुन परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्याने सुसाईड नोटमध्ये केला आहे. 

(नक्की वाचा - Crime News : 550 किमी लांबून यायचे अन् पोलिसांची डोकेदुखी वाढवायचे; दोघांना अटक)

टोनी हे बऱ्याच काळापासून बेरोजगार होते. दाम्पत्यावर कर्ज देखील झाले होते. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. शिवाय मुल होत नसल्यामुळे देखील दोघे नैराश्येत होते. या कारणांतून दाम्पत्याने जीवनयात्रा संपवल्याचे कारण समोर आले आहे. 

मॉनक्रिप दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवून व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांनी अंतिम संस्कार करण्यासाठी 75 हजार रुपये ठेवले असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे. आपले राहते घर कुणाला द्यावे, याची सुद्धा नोंद त्यांनी स्टॅम्प पेपरमध्ये केली आहे.

Advertisement

(नक्की वाचा- Smartwatch Feature: स्मार्टवॉच सोडवणार सिगारेट ओढण्याचं व्यसन, काय आहे नवी टेक्नोलॉजी?)

व्हिडियोमध्ये महिलेने कुणी शोक पाळू नका. कुटुंबातील लग्न कार्य व्यवस्थित होऊ द्या. आम्ही गेल्यावर दुखी होऊ नका, असा संदेश रेकॉर्ड केला आहे. या घटनेमुळे जरीपटका परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Topics mentioned in this article