Crime News : कल्याण अल्पवयीन मुलीचं हत्या प्रकरण; आरोपीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा ऐकून पोलीसही चक्रावले

Kalyan Crime News : शेगाव येथून पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल गवळीच्या पत्नीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीच्या पत्नीने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केले आहेत. 

शेगाव येथून पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षीने सांगितलं की, मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतले. त्यावेळी विशाल गवळीने मुलीसोबत गैरकृत्य करून हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता. आरोपीची पत्नी बँकेत नोकरी करत असल्याने संध्याकाळी 7 वाजता घरी आली. 

(नक्की वाचा-  अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण; मुख्य आरोपीला अटक)

त्यावेळी आरोपी पतीने पत्नीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून तिला धक्काच बसला. मात्र नंतर 7 वाजता दोघे पती-पत्नी एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे याबद्दल योजना आखली. त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले. रात्री 8.30 वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. 9 वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले. तिथे मृतदेह फेकून दोघे घरी परतले. 

Advertisement

(नक्की वाचा-  20 रुपये घेऊन खाऊ आणायला घराबाहेर गेली अन् आढळला मृतदेह; 1 वर्षांपूर्वीच कनेक्शन उघड)

घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या गावी बुलढाणा येथे निघून गेला. पत्नी साक्षी मात्र येथेच राहिली. मात्र घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशाल याने हे कृत्य केल्याचा संशय आला. पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी विशालला पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

Topics mentioned in this article