Pune Crime News: पुण्यात चाललंय काय? गुन्हेगाराचा पोलीस स्टेशनमध्येच तोडफोड करत राडा

Pune Crime News: राजू उर्फ बारक्या लोंढे असं तोडफोड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बारक्या लोंढेने  पोलीस ठाण्यात तोडफोड करत खिडक्यांच्या काचा फोडल्या.  

जाहिरात
Read Time: 1 min

रेवती हिंगवे, पुणे

Pune Crime News : कोयता गँग, वाढती गुन्हेगारी, ड्रग्स रॅकेट असा घटनांमुळे पुणे मागील काही काळापासून बदनाम होत आहे. पुण्यात पोलिसांचा वचक राहिला की नाही? असा सवाल अनेकदा उपस्थित होत होता. गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच वाटत नाही, अशी स्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुन्हेगारांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.  

पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींकडून तोडफोड करण्यात आली आहे. सहकारनगर परिसरातील एका गुंडाने पोलीस स्टेशनमध्ये राडा घातला. राजू उर्फ बारक्या लोंढे असं तोडफोड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बारक्या लोंढेने  पोलीस ठाण्यात तोडफोड करत खिडक्यांच्या काचा फोडल्या.  

कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहकारनगर पोलिसांनी लोंढेला ताब्यात घेत त्याला सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं.  याचवेळी या सराईत गुन्हेगाराने पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. काचांसोबत पोलीस स्टेशनमधील कॉम्प्युटर देखील फोडले. त्यामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. 

Topics mentioned in this article