
Cyclone Shakti Live Tracker: अरबी समुद्रात निर्माण झालेले 'शक्ती' (Shakhti) चक्रीवादळ आता अधिक तीव्र झाले असून त्याचे रूपांतर 'तीव्र चक्रीवादळी वादळ' (Severe Cyclonic Storm) मध्ये झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ भारताच्या किनाऱ्यापासून दूर जात असल्याने भूस्खलनाचा (Landfall) धोका नाही, मात्र किनारी भागांमध्ये सोसाट्याचे वारे आणि समुद्रात रौद्र स्थिती कायम राहील. हे वादळ आणखी किती दिवस राहणार? तसंच त्याची सध्याची स्थिती काय आहे? याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
शक्ती चक्रीवादळाची सद्यस्थिती (Cyclone Shakti: Latest Update)
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या माहितीनुसार, ईशान्य अरबी समुद्रावरील 'शक्ती' (Shakhti) चक्रीवादळ गेल्या 6 तासांमध्ये (शनिवार 4 ऑक्टोबर सकाळी 11.30 पर्यंत) वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. त्यामुळे त्याची तीव्रता वाढून ते तीव्र चक्रीवादळी वादळ बनले आहे.
हे वादळ शनिवारी ( 4 ऑक्टोबर) सकाळी 8.30 वाजता वायव्य (Northwest) आणि ईशान्य (Northeast) अरबी समुद्रावर 22.0N अक्षांश आणि 64.5E रेखांशाजवळ केंद्रित होते.
हे वादळ पश्चिम-नैर्ऋत्येकडे सरकून रविवारपर्यंत (5 ऑक्टोबर) वायव्य आणि पश्चिम-मध्य अरबी समुद्रात पोहोचेल. सोमवारी सकाळपासून (6 ऑक्टोबर) ते पुन्हा वळून पूर्व-ईशान्य दिशेने जाईल आणि हळूहळू कमकुवत होईल. मंगळवारी (7 ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत त्याची तीव्रता कमी होऊन ते खोल दाब क्षेत्रात (Deep Depression) रूपांतरित होईल.
and lay centered at 0830 hrs IST of today,the 4th October, 2025 over northwest& adjoining northeast Arabian Sea near latitude 22.0N and longitude 64.5E,about 470 km west of Dwarka, 470 km west-southwest of Naliya,
— India Meteorological Department (@Indiametdept) October 4, 2025
'शक्ती' नावाचा अर्थ काय?
'शक्ती' या नावाचा अर्थ तमिळ भाषेत 'सामर्थ्य' (Power) असा आहे. 2004 मध्ये जागतिक हवामान संघटनेने (WMO) निश्चित केलेल्या नामकरण प्रणालीनुसार हे नाव श्रीलंका देशाने सुचवले होते.
( नक्की वाचा : Cyclone Shakti Alert: सावधान! शक्ती चक्रीवादळ येतंय, 'या' जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी; वाचा सविस्तर )
भूस्खलन, अंदाज आणि तीव्रता (Landfall, Forecast And Intensity)
2025 या वर्षातील हे पहिले चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीपासून दूर जात असल्याने त्याचा थेट परिणाम (Landfall) भारतीय किनारपट्टीवर होणार नाही. तथापि, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रातील परिस्थिती रौद्र (rough) राहण्याची शक्यता आहे.
तुम्ही Zoom Earth वर चक्रीवादळ शक्तीचे लाईव्ह ट्रॅकिंग तपासू शकता. त्यासाठी इथे क्लिक करा.
मासेमारांना हवामान विभागाचा इशारा (Cyclone Shakti: Weather Warnings Issued To Fishermen)
हवामान विभागाने अरबी समुद्रात मासेमारी करणाऱ्यांनाही इशारा दिलाय. त्यांनी 4 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये वायव्य अरबी समुद्र, त्याला लागून असलेला ईशान्य अरबी समुद्राचा भाग, मध्य अरबी समुद्र आणि गुजरात-उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी तसेच समुद्रात जाऊ नये, असे हवामान विभागानं स्पष्ट केलंय.
किनारपट्टीवरील नागरिकांनी आणि पर्यटकांनी समुद्राजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिकृत आणि ताज्या माहितीसाठी IMD च्या वेबसाइमधील या विभागावरील अपडेट चेक करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world