डोंबिवली पुन्हा स्फोटानं हादरली, 9 जखमी, नेमकं काय झालं?

Dombivli Blast : डोंबिवली MIDC मधील अमुदान कंपनीत स्फोट झाल्याचं प्रकरण अद्याप ताजं आहे. त्यापाठोपाठ डोंबिवलीत आणखी एक स्फोट झाला.

Advertisement
Read Time: 2 mins
डोंबिवली:

डोंबिवली MIDC मधील अमुदान कंपनीत स्फोट झाल्याचं प्रकरण अद्याप ताजं आहे. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झालाय. त्यापाठोपाठ आज (मंगळवार, 29 मे) रोजी डोंबिवलीत आणखी एक स्फोट झाला. डोंबिवलीतील टंडन रोडवरी एका चायनिज दुकानात एका सिलेंडरचा स्फोट झाला. या दुकालाला प्रथम आग लागली त्यानंतर दुकानात घरगुती वापराचे सिलेंडर होते ते फुटले अशी माहिती अग्निशमन दलानं दिली. या स्फोटात 9 जण जखमी असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलीय. यामधील दोन जण गंभीर आहेत. 

( नक्की वाचा : डोंबिवली स्फोट प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक )

हे दुकान नेमके कोणाचे होते याची कोणतीही माहिती अग्निशमन विभागाकडे नाही. या दुकानाचे मालक देखील घटना घडली त्यावेळी उपस्थित नव्हते. मात्र हे दुकान अधिकृत की अनधिकृत असा प्रश्न डोंबिवलीकरांनी उपस्थित केला आहे. या दुकानाला अग्निशमन विभागाची परमिशन होती का? आग विझवण्याची यंत्रणा होती का यांना कोण पाठीशी घालते का विनापरवाना सेटिंग करून ही टपरी चालू होती का? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. इतकेच नव्हे तर ही टपरी रात्री उशिरापर्यंत चालू असते अशी माहिती सभोवतालच्या नागरिकांनी दिली आहे. त्याचबरोबर वेळीच आग विझल्यानं ही मोठा अनर्थ टळला असल्याची भावना व्यक्त करण्यात आलीय.

( नक्की वाचा : डोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, केमिकल कंपन्याबाबत केली मोठी घोषणा )

साईनाथ पूचाळकर, अमित जटाकर, सतीश कासलाकर, राजू रजभर, अरुण अहिरे, दिनेश शेठ, जगदीश अरद, समाधान पवार आणि विजय दास अशी या जखमींची नावं आहेत. यामधील दोन गंभीर रुग्णांना शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  तर उर्वरित सर्वांना इश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 
 

Topics mentioned in this article