D Mart Secret: डी-मार्टमध्ये शॉपिंग करताय? 'या' टिप्स फॉलो करा, 5 हजारांचे बिल होईल 2 हजार

डी-मार्टमध्ये 5 हजार रुपयांच्या शॉपिंगचे बिल चक्क 2 हजार रुपयांपर्यंत आणता आले तर? याचे काही खास 'सीक्रेट्स' आता समोर आले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • डी-मार्टमध्ये ग्राहक आकर्षक ऑफर्समुळे गरजेच्या वस्तूशिवायही अनावश्यक खरेदी करतात आणि बजेट वाढते
  • खरेदीसाठी जाण्यापूर्वी वस्तूंची यादी तयार केल्यास अतिरिक्त खर्च टाळता येतो आणि नियोजन करता येते
  • मध्यम किंमतीच्या गुणवत्तापूर्ण वस्तूंची निवड केल्यास महागड्या ब्रँडच्या वस्तूंपेक्षा बचत शक्य होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

सर्वसामान्यांपासून ते नोकरदारांपर्यंत सर्वांचीच खरेदीसाठी पहिली पसंती असते ती म्हणजे 'डी-मार्ट' (D-Mart). डी-मार्टमध्ये नेहमीच ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. इथल्या वस्तू स्वस्त मिळतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण तरीही अनेकांचे बजेट कोलमडते. डी मार्टमध्ये गेल्यावर खरेदीवर अनेकांचे नियंत्रण राहत नाही. हा सर्वांनाच येणारा अनुभव आहे. त्यासाठी तिथे असलेल्या आकर्षक ऑफर्स कारणीभूत ठरतात. त्यावर उपाय काय असा अनेक जण विचार करत असतील. तर डी-मार्टमध्ये 5 हजार रुपयांच्या शॉपिंगचे बिल चक्क 2 हजार रुपयांपर्यंत आणता आले तर? याचे काही खास 'सीक्रेट्स' आता समोर आले आहेत.

डी-मार्टमध्ये गेल्यानंतर ग्राहक केवळ गरजेच्याच नाही, तर गरज नसलेल्या वस्तूही ट्रॉलीमध्ये भरतात. आकर्षक पॅकेजिंग आणि एकाच छताखाली मिळणाऱ्या हजारो वस्तूंमुळे अनावश्यक खरेदी वाढते. तसेच, एकाच वस्तूचे 5 ते 6 विविध ब्रँड्स उपलब्ध असल्याने ग्राहक गोंधळून जातात आणि अनेकदा महागड्या ब्रँड्सची निवड करतात. त्यामुळे आपोआप बजेट वाढते. अशा वेळी आपल्या बजेटमध्ये खरेदी कशी करावी यासाठी खास ट्रीक आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात बचत करायची असेल, तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरेदीला जाण्यापूर्वी वस्तूंची यादी (Shopping List) तयार करा. 

Advertisement

नक्की वाचा - Beed News: वय वर्ष 19, लग्न झाली 8, देखण्या तरुणीचं 9 वं लग्न, पण पुढे जे घडलं त्याने नवरदेव ढगात

केवळ यादीत असलेल्याच वस्तू खरेदी केल्यास अतिरिक्त खर्च टाळता येतो. दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे ब्रँडची निवड. एखाद्या प्रसिद्ध कंपनीच्या वस्तूऐवजी त्याच गुणवत्तेची पण मध्यम किंमत असलेली वस्तू निवडल्यास बिलात मोठी घट होते. डी-मार्टमध्ये अनेकदा 'बाय वन गेट वन फ्री' (Buy 1 Get 1 Free) अशा ऑफर्स असतात. अशा ऑफर्सचा विचारपूर्वक लाभ घेतल्यास किराणा माल निम्म्या किमतीत मिळू शकतो. डी-मार्ट हे केवळ स्वस्त दरांसाठीच नाही, तर तिथे मिळणाऱ्या विविध पर्यायांसाठी ओळखले जाते. मात्र, अनेकदा ग्राहक नियोजनाअभावी अधिक खर्च करतात. 

नक्की वाचा - DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल

'मॅनेजमेंट'च्या भाषेत सांगायचे तर, जर ग्राहकांनी केवळ ब्रँड व्हॅल्यूच्या मागे न लागता उत्पादनाची गुणवत्ता आणि किंमत यांची तुलना केली, तर 50% पेक्षा जास्त बचत होऊ शकते. विशेषतः ऑफर्सच्या काळात बल्क शॉपिंग करणे फायदेशीर ठरते. त्यासाठी खिशाला परवडणारी खरेदी करायची असेल तर डी-मार्टला पर्याय नाही. पण तिथं गेल्यावर होणारा अवाढव्य खर्च कसा रोखायचा? जाहिरातींना न भुलता 'स्मार्ट शॉपिंग' करा. मोठ्या ब्रँड्सच्या शेजारीच ठेवलेल्या स्वस्त आणि चांगल्या पर्यायांची निवड करा. गरज नसताना सेलच्या नादात वस्तू भरू नका. तुमची ही सतर्कताच तुमच्या हक्काच्या पैशांची बचत करेल. वस्तूंची निवड आणि ऑफर्सचा अचूक वापर केल्यास तुमचे मासिक बिल मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.